Advertisement

वरळी कोळीवाडा समुद्रकिनारी राबवली जाणार 24x7 स्वच्छता अभियान

महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, दुर्गंधी कमी करण्यासाठी विशेष यंत्रणा बसविण्यात येतील.

वरळी कोळीवाडा समुद्रकिनारी राबवली जाणार 24x7 स्वच्छता अभियान
SHARES

३.५ किलोमीटर लांबीच्या वरळी कोळीवाडा समुद्रकिनाऱ्याच्या दैनंदिन स्वच्छता आणि देखभाल आराखड्याला बृहन्मुंबई महानगरपालिकेची (BMC) मंजुरी मिळाली आहे. याची अंमलबजावणी करार पद्धतीने केली जाणार आहे. 

हा उपक्रम वारसा संवर्धन आणि सार्वजनिक क्षेत्र सुधारणा या उपक्रमांच्या चौकटीत आखण्यात आला आहे. या नवीन व्यवस्थेनुसार वार्षिक 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पाण्यावरच कचरा अडवणे, किनाऱ्याची स्वच्छता यासह संपूर्ण देखभालीची जबाबदारी ठेकेदाराकडे सोपविण्यात आली आहे.

नगरसेवकांनी सांगितले आहे की, दुर्गंधी कमी करण्यासाठी विशेष यंत्रणा वापरल्या जातील. तसेच, पुढील टप्प्यात समुद्रकिनाऱ्यालगत अखंड पदपथ विकसित करण्याची संकल्पना देखील मांडण्यात आली आहे.

महापालिका अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे की, या निर्णयापूर्वी कोणताही सर्वसमावेशक किनारपट्टी देखभाल आराखडा अस्तित्वात नव्हता. त्याऐवजी, अधूनमधून कचरा गोळा करणाऱ्या गाड्यांद्वारे ठराविक वेळी साफसफाई केली जात होती.

आता या नव्या निर्णयामुळे अधूनमधून होणाऱ्या स्वच्छतेऐवजी २४x७ सतत स्वच्छता व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

वरळी कोळीवाडा परिसर हा बोटींच्या पार्किंग आणि कार्यासाठी वापरला जाणारा किनारा असल्याने, स्वच्छतेचा थेट संबंध स्थानिकांच्या उपजीविकेशी आणि सुरक्षेशी जोडलेला आहे. 



हेही वाचा

पालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत 'या' दिवशी होणार

लवकरच ठाणे ते डोंबिवली प्रवास 25 मिनिटांत होणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा