• अडीच फूट उंचीच्या अनुष्काने बारावीत मिळवले 74% गुण!
SHARE

घरची परीस्थिती अत्यंत हलाखीची. पण परिस्थितीसमोर न झुकता जिद्दीच्या जोरावर अवघी अडीच फूट उंची असलेल्या अनुष्का नाईक हिने बारावीत 74 टक्के गुण मिळवून समाजातील इतर विद्यार्थ्यांपुढे एक जबरदस्त आदर्श निर्माण केला आहे. अनुष्का हिने आपल्या कर्तृत्व आणि इच्छाशक्तीने शारीरिक, मानसिक तसेच आर्थिक अशा अनेक संकटांवर मात करून बारावीच्या परीक्षेत 74 टक्के गुण मिळवले. त्यामुळे सर्वच स्तरावरून तिचं कौतुक होत आहे.

लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डाॅ. प्रशांत पाटील आणि मानवाधिकार संघटनेचे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष, तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सदस्य डाॅ. शशिकांत बामने आणि अभिनेत्री हर्षदा बामने यांनी अनुष्का नाईक हिला सदिच्छा भेट दिली.

'भविष्यात आपल्याला पदवीधर व्हायचे आहे, असे अनुष्काने ठामपणाने सांगितले. त्यातूनच तिला स्वतःबद्दलचा आसलेला आत्मविश्वास बरेच काही सांगून गेला', अशी प्रतिक्रिया डॉ. शशिकांत बामने यांनी दिली. आपला समाज आणि आमच्याशी निगडीत संस्था नेहमी तिच्या पाठिशी असेल, असा विश्वास डाॅ. शशिकांत बामने आणि अभिनेत्री हर्षदा बामने यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या