Advertisement

कोरोनाचा मुंबई पोलिसांना फटका; २७९ पोलिसांना कोरोनाची लागण

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाचा मुंबई पोलिसांना फटका; २७९ पोलिसांना कोरोनाची लागण
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच आता मुंबईकरांची प्रत्येक संकटात सुरक्षा करणाऱ्या मुंबई पोलिसांनाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केवळ ७ दिवसात २७९ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

गेल्या ७ दिवसात मुंबईत २७९ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या रविवारी एका पीएसआयचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. ११ एप्रिलपर्यंत मुंबईतील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या ७९९७वर गेली होती. त्यापैकी ७४४२ पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. सध्या ४५४ पोलिस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत १०१ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील ७० टक्के पोलिसांना कोरोना व्हॅक्सीनचा डोस देण्यात आला आहे. ११ एप्रिलपर्यंत ३०,७५६ पोलिसांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्यात २६९० पोलीस अधिकाऱ्यांचा आणि २८,०६६ पोलीस शिपायांचा समावेश आहे. जवळपास १७३१५ पोलीस कर्मचाऱ्यांना व्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यात १३२५ पोलीस अधिकारी आणि १६,०२६ पोलीस शिपायांचा समावेश आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा