SHARE

विभक्त कुटुंब पद्धतीमुळं मुंबईतल्या वृद्धांचीही परवड होऊ लागलीय. त्यामुळं शहरात आता वृद्धाश्रमांचीही मागणी वाढू लागलीय. या मागणीची पूर्तता करण्यासाठी आगामी विकास आराखड्यात वृद्धाश्रमांकरीता २८ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. नियोजन समितीने त्यासाठी २६ आरक्षणे निश्चित केली होती, त्यापैकी १ आरक्षण रद्द करून ३ नव्याने आरक्षण टाकण्यात आले आहे.


मातापित्यांचा विसर

मुंबईतील विभक्त कुटुंबपद्धतीत तरुण पिढीला वृद्ध मातापित्यांचाही विसर पडत चालला आहे. नवी पिढी आई-वडिलांपासून दुरावत चालल्याने वृद्धांना उतारवयात लागणारा मानसिक आधार, पुरेसा वेळ देण्यास त्यांची अपत्ये असमर्थ ठरत आहेत.


ठरावाच्या सूचनेद्वारे मागणी

अशा स्थितीत वृद्धाश्रमांची मागणी वाढत असल्याने मुंबईत प्रभागनिहाय वृद्धाश्रम बांधण्याकरता आगामी विकास आराखड्यात भूखंड आरक्षित ठेवण्याची मागणी तत्कालीन काँग्रेस नगरसेविका ज्योस्ना दिघे यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली होती.


इतके आरक्षण

मुंबईचा विकास आराखडा मंजूर करून महापालिकेने तो राज्य सरकारकडे पाठवला आहे, पुनर्रचित प्रारूप आराखड्यात प्रत्येक विभागात वृद्धाश्रमांसाठी २६ जागेवर एकूण ५.०८ हेक्टर क्षेत्रफळ इतके क्षेत्र आरक्षित करण्यात आले होते.

परंतु हरकती व सूचनांनंतर नियोजन समितीने २६ पैकी १ आरक्षण वगळण्याची शिफारस केली. तसेच ३ नवीन आरक्षणांचा समावेश केला. त्यानुसार वृद्धाश्रमांसाठी एकूण २८ आरक्षणे असून त्याचे क्षेत्रफळ हे ५.३ इतके असल्याची माहिती विकास नियोजन विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी दिली.हे देखील वाचा -

विकास आराखड्यावर ३०० नवीन सूचना, पण यादीच तयार नाही?डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
ताज्या बातम्या