सिलेंडर स्फोटात तिघे जखमी

 Kandivali
सिलेंडर स्फोटात तिघे जखमी

कांदीवली येथील अभिलाख नगरमधील एका घरात सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये घरातील 3 व्यक्ती आणि त्यांना वाचवण्यासाठी आलेला एक व्यक्ती भाजल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना बुधवारी सकाळी 8 च्या सुमारास घडली. अभिलाख नगरमध्ये राहणाऱ्या मूलचंद यादव गॅसचे कनेक्शन लावत होते. मात्र त्यांना ते लागत नसल्यामुळे त्यांनी शेजारीच राहणाऱ्या अमरजीत यांना मदतीसाठी बोलावले. मात्र अमरजीत कनेक्शन लावल्यानंतर गॅस पेटवण्यासाठी माचिस पेटवताच गॅसचा अचानक स्फोट झाला. यामध्ये मूलचंद आणि त्यांची पत्नी रमा देवी यांच्यासह शेजारी अमरजीत देखील भाजले. दरम्यान जखमींना शताब्दी आणि ऑस्कर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading Comments