Advertisement

प्रोत्साहन भत्त्यापोटी महापालिकेचे ३८३ कोटी खर्च

कोरोनाच्या काळात अनेक डॉक्टर, नर्स, सफाई कामगार व पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून काम केलं.

प्रोत्साहन भत्त्यापोटी महापालिकेचे ३८३ कोटी खर्च
SHARES

कोरोनाच्या काळात अनेक डॉक्टर, नर्स, सफाई कामगार व पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून काम केलं. या भयानक कालवधीत दिवसरात्र कार्यरत असलेल्या महापालिकेच्या आरोग्य व अन्य विभागांतील कर्मचारी, अधिकारी, परिचारिका, डॉक्टर यांना दररोज ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जात होता. अशा ९० हजार कर्मचारी-अधिकाऱ्यांना ७ महिन्यांच्या कालावधीत ३८३ कोटी रुपये कोरोना भत्ता देण्यात आला.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत मार्च महिन्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. या काळात महापालिकेच्या अत्यावश्यक आणि आरोग्य खात्यातील सर्वच कर्मचारी दिवसरात्र कार्यरत होते. या काळात महापालिकेच्या १ लाख २ हजार कर्मचाऱ्यांपैकी ९० हजार कोरोना योद्धे प्रत्यक्षात मैदानात उतरून काम करत होते. मात्र, लोकल सेवा बंद असल्यानं त्यांना कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी जून ते डिसेंबर २०२० या ७ महिन्यांत दररोज जोखीम भत्ता स्वरूपात ३०० रुपये देण्यात येत होते.

या कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी कोरोना संसर्गावेळी लॉकडाऊन मिळून एकूण अशा ७ महिन्यांच्या कालावधीत महापालिकेनं ९० हजार कोविड योद्ध्यांना भत्तास्वरूपात दरमहा ७० कोटी देण्यात आले. ७ महिन्यांत या स्वरूपात एकूण ३८३ कोटी ८६ लाख ४३ हजार ८२७ रुपये खर्च झाले, अशी माहिती महापालिका प्रशासनानं स्थायी समिती बैठकीसमोर सादर केली.



हेही वाचा -

रेल्वे प्रवासी संख्येत वाढ

रेल्वे मार्गावर मास्कविना प्रवास करणाऱ्या 'इतक्या' जणांवर कारवाई


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा