Advertisement

रेल्वे प्रवासी संख्येत वाढ

सर्वसामांन्यांना गर्दीची वेळ टाळून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

रेल्वे प्रवासी संख्येत वाढ
SHARES

मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा अखेर सर्वसामान्यांसाठी सुरू झाली. तब्बल १० महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर प्रवाशांना सोमवारी पहिली लोकल पकडली. सर्वसामांन्यांना गर्दीची वेळ टाळून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. पर्याय नसल्यानं ही वेळ अनेकांनी स्वीकारल्याचं चित्र मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय स्थानकात दिसत होतं.

नेहमीपेक्षा प्रत्येकी ४ ते ५ लाख अतिरिक्त प्रवाशांनी प्रवास केला. या दोन्ही मार्गावरील तिकिटांची आणि पासची विक्री वाढली. अनेकांनी आखून दिलेल्या प्रवास वेळेतच पास काढण्यासाठी रांगाही लावल्या. त्यामुळं तिकीट खिडक्यांसमोर लांबच लांब रांगा होत्या.

लॉकडाऊनमध्ये सामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास बंदच होता. अखेर १ फेब्रुवारीपासून सामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी देताना वेळेची मर्यादा घालण्यात आली. पहाटे पहिल्या लोकलपासून ते सकाळी ७ पर्यंत आणि दुपारी १२ ते दुपारी ४ व रात्री ९ नंतर सर्वाना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. मंगळवारपासून लोकलने प्रवास करता यावा यासाठी अनेकांनी सोमवारी सकाळी ७ च्या आधी तसेच दुपारी १२ ते दुपारी चार या वेळेत स्थानक गाठून प्रवास पास काढला.

दादर, अंधेरी ते बोरिवलीपर्यंतची स्थानके , वसई, विरार,नालासोपारा, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह अन्य काही स्थानकांत तिकीट आणि पास घेण्यासाठी रांगा होत्या.

२९ जानेवारीला पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरून साडेनऊ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. सोमवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ११ लाख ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला. रात्री उशिरापर्यंत प्रवासी संख्येत ४ लाखांहून अधिक भर पडण्याची शक्यता पश्चिम रेल्वेनं व्यक्त केली. मध्य रेल्वेवरून २९ जानेवारीला १३ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. १ फेब्रुवारीला संध्याकाळी ६ वाजेपर्यंत १४ लाख ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला आणि रात्री उशिरापर्यंत ५ लाखांहून अधिक प्रवाशांची भर पडण्याची शक्यता आहे.



हेही वाचा - 

रेल्वे मार्गावर मास्कविना प्रवास करणाऱ्या 'इतक्या' जणांवर कारवाई

मुंबईतील कोरोना स्थिती नियंत्रणात; प्रतिबंधित क्षेत्रांत वाढ


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा