Advertisement

पुणे-मुंबई द्रूतगती मार्गावर सिमेंटच्या ट्रकची ३ कारला धडक, ४ जणांचा मृत्यू

पुणे-मुंबई द्रूतगती मार्गवरील आडोशी बोगद्याजवळ हा ट्रक उलटला. हा सिमेंटचा ट्रक पुण्याहून मुंबईच्या दिशेनं येत होता. आडोशी बोगद्याजवळ आपल्यावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून हा ट्रक आपल्यापुढील ३ कारला धडकला. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ३ जण गंभीर जखमी झाले.

पुणे-मुंबई द्रूतगती मार्गावर सिमेंटच्या ट्रकची ३ कारला धडक, ४ जणांचा मृत्यू
SHARES

पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गवर ३ कारला धडक दिल्यानंतर एक सिमेंटचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. अद्याप या ७ जणांची नावे समजलेली नसून जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.


'असा' घडला अपघात

पुणे-मुंबई द्रूतगती मार्गवरील आडोशी बोगद्याजवळ हा ट्रक उलटला. हा सिमेंटचा ट्रक पुण्याहून मुंबईच्या दिशेनं येत होता. आडोशी बोगद्याजवळ आपल्यावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून हा ट्रक आपल्यापुढील ३ कारला धडकला. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ३ जण गंभीर जखमी झाले.


मार्गावर वाहतूककोंडी

या अपघातात जखमी झालेल्या ३ जणांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तसंच, या अपघातामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक काही वेळेसाठी पूर्णपणे थांबवण्यात आली. परिणामी या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा