देशपांडेंविरोधात अभियंते आक्रमक

  Pali Hill
  देशपांडेंविरोधात अभियंते आक्रमक
  मुंबई  -  

  मुंबई – खड्ड्यांवरून मनसे आणि पालिका अभियंत्यामधील वाद आता चांगलाच पेटला आहे. पालिका अभियंत्यांना खड्ड्यात उभ्या करणाऱ्या संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरोधात कारवाईची मागणी करत सुमारे 4200 पालिका अभियंत्यांनी गुरुवारी सकाळपासून काम बंद आंदोलनास सुरुवात केली आहे. तसेच देशपांडे दोन दिवसांत अटक न झाल्यास दीड ते दोन हजार अभियंत्यांनी सामूहिक राजीनाम्यांची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, संदीप देशपांडे आणि संदीप देशपांडेविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  याविषयी म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनचे सुखदेव काशीद म्हणाले, "अशा प्रकारे अभियंत्यांना वेठीस धरणे, त्यांचा मानसिक छळ करणे चुकीचे आहे. खड्डे वा कुठल्याही कामासाठी केवळ अभियंते कसे काय दोषी ठरतील?, मुंबईच्या भौगोलिक स्थितीचा आणि इतर तांत्रिक अडचणींचा कामावर किती आणि कसा परिणाम होतो हे या नगरसेवकांना माहित नाही का?"
  मात्र अभियंत्यांच्या आंदोलनाची झळ सर्वसामान्यांना बसू देणार नसल्याचे काशीद यांनी सांगितले. "अभियंत्यांच्या आंदोलनीचा झळ मुंबईकरांना बसू देणार नाही. पाणी, वीज, साफसफाई अशा सेवेवर परिणाम होऊ देणार नाही, कारण आमचा वाद जनतेशी नाही, पण देशपांडे आणि धुरीविरोधात कारवाई झाली नाही तर हे आंदोलन मोठे होईल आणि त्यात केवळ अभियंतेच नव्हेतर पालिकेचा प्रत्येक कर्मचारीही सहभागी होतील आणि त्यानंतर जे काही होईल त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही", असा इशाराही काशीद यांनी दिला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.