ठाणे (thane) जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीमध्ये (vidhan sabha elections) ‘नोटा’वर (NOTA) अर्थात ‘वरील पैकी कोणताही उमेदवार नको’ या पर्यायासाठी तब्बल 47 हजार 242 जणांनी मतदान (vote) केले. सर्वाधिक मतदान शहापूरमध्ये झाले असून या ठिकाणी 4 हजार 892 इतके मतदान झाले आहे.
विशेष म्हणजे, याच मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार (ajit pawar) गटाचे दौलत दरोडा आणि शरद पवार गटाचे पांडुरंग बरोरा यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली होती. अवघ्या 1 हजार 672 मतांनी दौलत दरोडा निवडून आले. तर शहापूर प्रमाणेच, ठाण्यातील संमिश्र वस्ती असलेल्या ओवळा माजिवडा मतदारसंघात नोटाला 4 हजार 193 इतके मतदान झाले.
ठाणे जिल्ह्यात 18 विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला. यातील तब्बल 16 मतदारसंंघात महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. ठाणे जिल्ह्यात 56.5 टक्के इतके मतदान झाले असून 2019 च्या तुलनेत मतांचा टक्का काही प्रमाणात वाढला आहे.
जिल्ह्यात 244 उमेदवार रिंगणात होते. काही मतदारसंघात 20 हून अधिक उमेदवार निवडणूक लढवित होते. असे असतानाही नागरिकांनी अपक्ष किंवा एखाद्या संघटनेपेक्षाही ‘नोटा’ या पर्यायाला मतदान दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहापूर (shahapur) जिल्ह्यात यावर्षी 68.32 टक्के इतके मतदान झाले होते. याच मतदारसंघात नोटाला जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान झाले. शहापूर विधानसभेत नऊ उमेदवार निवडणूक लढवित होते. तर या मतदारसंघात नोटाला 4 हजार 892 इतके मतदान झाले.
यापाठोपाठ ओवळा माजिवडा मतदारसंघातही 4 हजार 193 इतके मतदान नोटाला झाले. या मतदारसंघात 14 उमेदवार निवडणूक लढवित होते, तर 52.25 टक्के मतदान या मतदारसंघात झाले होते. मुरबाड मतदारसंघात 9 उमेदवार निवडणूक लढवित होते.
तर नोटाला 3 हजार 952 इतके मतदान झाले. मुरबाडमध्ये एकूण 64.92 इतके मतदान झाले होते. नोटा पर्यायाला सर्वात कमी मतदान भिवंडीत झाले. भिवंडी पूर्वमध्ये 738, भिवंडी पश्चिममध्ये 1 हजार 72 इतकेच मतदान झाले.
मतदारसंघ आणि नोटाला पडलेली मते
ठाणे – 2694
कोपरी पाचपाखाडी - 2676
ओवळा – माजिवडा – 4193
मुंब्रा-कळवा – 2679
भिवंडी पूर्व – 738
भिवंडी पश्चिम – 1072
भिवंडी ग्रामीण – 2571
कल्याण पूर्व – 1872
कल्याण पश्चिम – 2774
कल्याण ग्रामीण – 2734
डोंबिवली – 2745
अंबरनाथ – 2316
उल्हासनगर- 1759
मुरबाड – 3952
शहापूर – 4892
मिरा भाईंदर – 2279
बेलापूर – 2588
ऐरोली – 2708
एकूण – 47242
हेही वाचा