Advertisement

मुंबईत तब्बल ४९ केंद्रे लससाठ्याअभावी बंद

मंगळवारी तब्बल ४९ केंद्रे लससाठ्या अभावी बंद ठेवावी लागली. त्यात पालिकेच्या ६ व राज्य आणि केंद्र सरकारच्या पाच केंद्रांचाही समावेश आहे.

मुंबईत तब्बल ४९ केंद्रे लससाठ्याअभावी बंद
SHARES

मंगळवारी तब्बल ४९ केंद्रे लससाठ्या अभावी बंद ठेवावी लागली. त्यात पालिकेच्या ६ व राज्य आणि केंद्र सरकारच्या पाच केंद्रांचाही समावेश आहे. त्यामुळे एकूण लसीकरणाच्या वेगावर त्याचा परिणाम झाला असून दैनंदिन लसीकरणाचे प्रमाण घटलं आहे.

मुंबईत मंगळवारी ३९ हजार ५२२ नागरिकांना लस देण्यात आली. त्यापैकी १५ हजार ५१ नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली. मुंबईत सध्या १२९ केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. त्यात पालिकेची ३९, राज्य व केंद्र सरकारची १७, खासगी ७३ केंदे्र आहेत. त्यात खासगी केंद्रावर दिवसभरात ७,४९३ नागरिकांचे लसीकरण होऊ शकली. लशीचा साठा पुरेसा नसल्यामुळे गेल्या २ दिवसांपासून काही खासगी केंदे्र बंद ठेवावी लागली होती. मात्र मंगळवारी पालिकेची व सरकारी केंद्रेही बंद ठेवावी लागली. काही केंद्रावर फक्त एकाच पाळीत लसीकरण झाले.

मुंबईत आतापर्यंत २० लाख ४३ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी २ लाख ७६ नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली आहे. एकूण लसीकरणात पालिके च्या केंद्रांवर सर्वाधिक म्हणजे १३ लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा