Advertisement

मुंबईत कोरोनाचे 494 नवे रुग्ण; 8 रुग्णांचा मृत्यू


मुंबईत कोरोनाचे 494 नवे रुग्ण; 8 रुग्णांचा मृत्यू
SHARES

मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या दहा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला आहे. आज मुंबईत कोरोनाचे 494 नवे रुग्ण आढळून आले असून 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मुंबईत आज 494 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 8 हजार 57 वर पोहचला आहे. आज 8 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 334 वर पोहचला आहे. 589 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 2 लाख 90 हजार 400 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 5 हजार 417 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून, रुग्ण दुप्पटीचा कालावधी 557 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 198 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर, 2 हजार 219 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 27 लाख 73 हजार 166 चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, तर 26 जानेवारीला 342 म्हणजेच, सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.


 राज्यात आज 539 केंद्रांच्या माध्यमातून 40 हजार 539 (74 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात आज सर्वाधिक लसीकरण बीड जिल्ह्यात (131 टक्के) झाले असून त्या पाठोपाठ सातारा, धुळे, वर्धा, पालघर या जिल्ह्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झाले. राज्यात आतापर्यंत 2 लाख 61 हजार 319 कर्मचाऱ्यांना लसीकरण झाले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा