Advertisement

मालाड : मार्वे बीचवर 5 शाळकरी मुलं बुडाली

12 ते 16 वयोगटातील 5 मुले समुद्राच्या किना-यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर बुडाली.

मालाड : मार्वे बीचवर 5 शाळकरी मुलं बुडाली
SHARES

मुंबईतील मार्वे बीचवर 5 मुलं बुडाली आहेत. यामधील दोघांना वाचवण्यात आलं असून, तिघांचा शोध अद्याप सुरु आहे. 

मालाड पश्चिम मार्वे क्रीक याठिकाणी समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या 12 ते 16 वयोगटातील 5 मुले समुद्राच्या किना-यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर बुडाली. त्यापैकी 2 मुले कृष्ण जितेंद्र हरिजन (16) आणि अंकुश भारत शिवरे (13) यांना स्थानिक लोकांनी बचावलं आहे.

मात्र यातील सुभम राजकुमार जैस्वाल (12), निखिल साजिद कायमकूर (13), अजय जितेंद्र हरिजन (12) हे तीन विद्यार्थी बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. 

नुकताच वांद्रेमधील बॅण्डस्टॅण्ड येथील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये एक विवाहित जोडपं समुद्राच्या लाटांची मजा घेत दगडावर बसले होते. यावेळी त्यांची मुलगी त्यांचा व्हिडीओ शूट करत होती. व्हिडीओत मुलांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे. समुद्रात लाटा उसळत असताना दोघेही दगडांवर बसले होते आणि एकमेकांना पकडलं होतं. पण त्यानंतर एक जोराची लाट येते आणि दांपत्य पाण्यात बुडतात. पण यावेळी पती वाचतो आणि महिला समुद्राच्या पाण्यात वाहून जाते. मुलगी यावेळी 'मम्मी, मम्मी....' असं ओरडत होती. व्हिडीओत हा आवाजही रेकॉर्ड झाला आहे. ज्योती सोनार अशी या महिलेची ओळख पटली आहे. त्या 32 वर्षांच्या होत्या. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा