Advertisement

नाशिक बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत

खासगी बसला (Bus Fire) भीषण आग लागून अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

नाशिक बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत
SHARES

खासगी बसला (Bus Fire) भीषण आग लागून अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शोक व्यक्त केला. या घटनेत 11 जणांचा मृत्यू तर 38 जण जखमी झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

 ते म्हणाले, जखमींवर तातडीनं उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत जखमींवर चांगले उपचार झाले पाहिजेत. उपचरात काही कमी पडू नयेत अशा सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

तसंच अपघातात मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं पाच लाख रुपयांची मदत जाहीर केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

नाशिक बस दुर्घटनेबाबत सर्व बाबी तपासण्यात येतील तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. परंतू आता जे जखमी आहेत, त्यांना उपचार देण्याला आता प्राधण्य द्यावं, अशा सुचना मी दिल्या असल्याचे शिंदे म्हणाले.

जखमी असणाऱ्यांपैकी दोन ते तीन जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवरचा उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे, तर मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून पाच लाखांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.



मुसळधार पावसाची शक्यता, मुंबईत आज 'यलो अलर्ट' जारी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा