Advertisement

मुसळधार पावसाची शक्यता, मुंबईत आज 'यलो अलर्ट' जारी

मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. संततधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भाग पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.

मुसळधार पावसाची शक्यता, मुंबईत आज 'यलो अलर्ट' जारी
SHARES

8 ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे हवामान विभागाने मुंबईला आज यलो अलर्ट जारी केला आहे. 

आजही राज्यभरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने मुंबईला आज यलो अलर्ट जारी केला आहे. तर पुढचे दोन दिवस मुंबईसह राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे.

त्यानंतर 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात होणार आहे. तर नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर तर विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. संततधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भाग पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. 



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा