Advertisement

हवा गुणवत्ता देखरेखीसाठी 5 नवीन वायू गुणवत्ता देखरेख केंद्रे

पर्यावरण खात्याकरिता 2025-26 च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये 113.18 कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.

हवा गुणवत्ता देखरेखीसाठी 5 नवीन वायू गुणवत्ता देखरेख केंद्रे
SHARES

पालिकेच्या 2025-26 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात शहरातील वायू गुणवत्तेच्या स्थितीवर सतत देखरेख ठेवण्याकरिता उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 5 नवीन अविरत वातावरणीय वायू गुणवत्ता देखरेख केंद्रे आणि 4 मोबाईल व्हॅनची सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

दरम्यान, पर्यावरण खात्याकरिता 2025-26 च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये 113.18 कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.

त्याचबरोबर धूलिकणांद्वारे होणाऱ्या प्रदूषणामधील स्थानिक, प्रादेशिक आणि दूरच्या स्त्रोतांच्या उत्सर्जनाचे परिणाम ठरवून 72 तास आधी वायू गुणवत्तेचा अंदाज देईल. त्यामुळे मुंबई महानगरपालिका वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक व नियंत्रणाच्या उपाययोजना राबवू शकेल.

तसेच ‘पर्यावरणीय व्यवस्थापन आराखड्यात’ बांधकाम प्रकल्पांसाठी 28 सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांच्या अंमलबजावणीची सुनिश्चिती करण्यासाठी विभाग स्तरावर अभियंता, क्लिनअप मार्शल आणि पोलिस यांचा समावेश असलेली 95 पथके तयार करण्यात आली आहेत.

आयआयटी कानपूर यांच्याकडून वायू प्रदुषणाच्या स्थानिक स्त्रोतांवर देखरेख ठेवण्यासाठी लो कॉस्ट सेन्सर बसविण्याचा ‘मुंबई एअर नोटवर्क फॉर अॅडव्हान्स सायन्स’ हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच पालिकेद्वारे दिल्या जाणाऱ्या परवानग्यांमध्ये बांधकाम ठेकेदारांना वायू प्रदूषण नियंत्रणाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन बंधनकारक करण्याबाबतच्या अटींचा समावेश करण्यात आला आहे.



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा