Advertisement

मुंबईकरांनो बादल्या भरा! बुधवारी शहर, उपनगरात पाणीकपात

मुंबईला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रात उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच, याअंतर्गत पंपिंग स्टेशनचेही काम करण्यात येणार असून यासाठी येत्या बुधवारी संपूर्ण शहर, तसेच पश्चिम उपनगरात ५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.

मुंबईकरांनो बादल्या भरा! बुधवारी शहर, उपनगरात पाणीकपात
SHARES

मुंबईला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रात उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच, याअंतर्गत पंपिंग स्टेशनचेही काम करण्यात येणार असून यासाठी येत्या बुधवारी संपूर्ण शहर, तसेच पश्चिम उपनगरात ५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी पाणीकपात

मुंबई महानगरपालिका विविध जलशुद्धीकरण प्रकल्पांद्वारे जलशुद्धीकरण प्रक्रिया करुन मुंबईच्या नागरिकांना पाणीपुरवठा करते. यापैकी एक भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण प्रकल्प असून या केंद्रात २.५ मेगा वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम सुरु आहे. या कामाअंतर्गत जुन्या पंपिंग स्टेशनमध्ये ३.३ के. व्ही. बस बारचा विस्तार करणे व २ व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर (व्हीसीबी) बसविण्याचे काम बुधवार २८ मार्च, २०१८ रोजी सकाळी ८.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.

वांद्रे ते दहिसर पाणी नाही

या भांडुप जलशुद्धीकरण केंद्रामध्ये करण्यात येणाऱ्या या कामासाठी बुधवारी मुंबई शहर भागासह वांद्रे ते दहिसर या पश्चिम उपनगराच्या पाणीपुरवठयात ५ टक्के कपात करण्यात येणार असल्याची माहिती जलअभियंता दिनेशचंद्र तवाडिया यांनी दिली आहे.

या भागांत होणार पाणीकपात

शहर - कुलाबा ते माहीम, धारावी
पश्चिम उपनगर - वांद्रे ते दहिसर

हेही वाचा

झोपडपट्टीतील मलमिश्रीत सांडपाणी पवई तलावात

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा