Advertisement

मुंबईत दिवसभरात 510 नवे रुग्ण, तर 18 जणांचा कोरोनाने मृत्यू


मुंबईत दिवसभरात 510 नवे रुग्ण, तर 18 जणांचा कोरोनाने मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा धोका आता अधिक वाढला आहे. रविवारी महाराष्ट्रात  771 नवे रुग्ण आढळले असून त्यात मुंबई 510 नवे रुग्ण आढळले असून मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईत एकूण 9123 रुग्ण आहेत. सोमवारी मुंबईत 18 जणांचा मृत्यू झाला असून मुंबईत कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा आता 361 वर जाऊन पोहचला आहे.

मागील दिवसांमध्ये मुंबईत कोरोना मृत्यूदर खाली आला होता. मात्र, पुन्हा मृत्यूंचं प्रमाण वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत रविवारी  भर पडली आहे. राज्यभरात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 35 रुग्ण दगावले आहेत तर 30 एप्रिल रोजी सर्वाधित मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. 2 मे रोजी रोजी एकूण 27 जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, सोमवारी मुंबईत कोरोनाचे 771 नवीन रुग्ण आढळले आहेत.

2 मे रोजी घेण्यात आलेल्या चाचण्यांचे काही अहवाल आले असून, त्यात436 संशयित रुग्ण आढळले आहेत. अशा एकूण 510 नवीन रुग्णांची भर पडली आहे.  अशा रुग्णांची एकूण संख्या आता 11 हजार 900 इतकी झाली आहे. मुंबईत एकाच दिवसात करोनाचे 104 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत करोनाची लागण झालेल्या एकूण 1 हजार 908 रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा