Advertisement

राज्यात बुधवारी दिवसभरात 597 नवीन रुग्णांची नोंद, तर 32 जणांचा मृत्यू


राज्यात बुधवारी दिवसभरात 597 नवीन रुग्णांची नोंद, तर 32 जणांचा मृत्यू
SHARES

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना, महाराष्ट्रात बुधवारी कोरोनाचे 597 नवे रुग्ण आढळून आले आहे. बुधवारी 205 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात कोरोनाने बाधित 7890 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर बुधवारी कोरोना या महामारीने 32 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने बाधित रुग्णांची संख्या 9915 इतकी आहे.

राज्यभरात कोरोनाशी दोन हात करण्यात संपूर्ण प्रशासन व्यस्त आहे. बुधवारी दिवसभरात कोरोनाच्या  1 लाख 37 हजार 159 नमुन्यांपैकी  1 लाख 26 हजार 376 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर  9915 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख  62  हजार 860 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 10 हजार 810 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर बुधवारी या महामारीने राज्यभरात  32 जणांचा बळी घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोना या महामारीने मृत्य पावलेल्यांची संख्या आता 432 इतकी झाली आहे.

बुधवारी मृत पावलेल्या 32 नागरिकांमध्ये मुंबईतील 26 रुग्णांचा समावेश आहे. तर पुणे शहरातील 3 आहेत.  या शिवाय सोलापूर शहरात 1, औरंगाबाद शहरात 1 आणि पनवेल शहरात 1 मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 25 पुरुष तर 7 महिला आहेत. बुधवारी झालेल्या 32 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 17 रुग्ण आहेत तर 15 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत.  या 32 रुग्णांपैकी 18जणांमध्ये (56 टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा