Advertisement

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! रस्त्यांची 60% ते 70% कामे पूर्ण

प्रभाग समितीनुसार सध्या 282 रस्त्यांची कामे सुरू आहेत

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! रस्त्यांची 60% ते 70% कामे पूर्ण
Representational Image
SHARES

प्रभाग समितीनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी यूटीडब्ल्यूटी, सिमेंट काँक्रिटींग आणि मस्तकी पद्धतीचा वापर करून रस्त्यांची कामे सुरू आहेत. नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी सध्या सुरू असलेली ६० ते ७० टक्के कामे पूर्ण झाली आहेत.

उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावीत यासाठी त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना रस्त्यांची कामे दर्जेदारपणे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठाणे महापालिका हद्दीतील रस्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नुकतीच बैठक घेतली.

रस्त्याचे काम दर्जेदारपणे व्हावे यासाठी सर्व कार्यकारी अभियंत्यांनी या कामावर देखरेख ठेवावी. ही कामे लवकर पूर्ण होतील अशा पद्धतीने शहरातील मुख्य रस्त्यांचे नियोजन करावे. सर्व कार्यकारी अभियंत्यांनी सुरू असलेल्या कामांचा दर्जा वेळोवेळी तपासून संबंधित ठेकेदारांना दर्जेदार रस्ते तयार करण्याच्या सूचना द्याव्यात.

प्रभाग समिती

  काम चालू असलेल्या रस्त्यांची संख्या

दिवा

 64
कळवा20

लोकमान्य सावरकर

20

माजिवडा मानपाडा

49

मुंब्रा

26

नौपाडा कोपरी

30

उथळसर

25

वर्तक नगर 

26

वाघले

22
Total282


ठाणे शहरासाठी राज्य सरकारने ६०५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याअंतर्गत प्रभाग समितीनुसार सध्या 282 रस्त्यांची कामे सुरू आहेत. याशिवाय महापालिकेच्या निधीतून सुरू असलेली रस्त्यांची कामे, शासकीय योजनांतर्गत रस्त्यांची कामे, अन्य प्राधिकरणांतर्गत रस्त्यांची कामे आदींचा आढावा आयुक्तांनी बैठकीत घेतला.

127 रस्त्यांची कामे सुरू असून त्यावर 214 कोटी रुपये तर 155 रस्त्यांच्या कामांसाठी 391 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. शहरातील सध्या सुरू असलेल्या रस्तेबांधणीच्या कामांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

रस्ता बांधकामादरम्यान रस्त्यावर पडलेला डेब्रिज त्वरित उचलावा. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे, तेथे लोकांना दिसेल अशा पद्धतीने सूचना फलक लावा, जेणेकरून त्याचा चांगला परिणाम होईल. रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी तीनही शिफ्टमध्ये काम सुरू ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

शहरात विविध अधिकारी कार्यरत आहेत. घोडबंदर रोडवर आणि मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी चर्चा करून काम पूर्ण करण्यासाठी मार्ग काढावा.

ठाणे प्रवेशद्वार येथे सुरू असलेली कामे दर्जेदार पद्धतीने व्हावीत जेणेकरून तेथे केलेले बदल नागरिकांना दिसावेत. कळवा नाका, आनंद नगर येथील लॅम्पपोस्टची कामे, चौकातील शिल्पकला, विविध ठिकाणी उद्यानांची कामे पूर्ण करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.



हेही वाचा

मुंबईत पाणी तुंबल्यास पालिका अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई, मुख्यमंत्र्यांचे आयुक्तांना आदेश

महापालिका निवडणूक ऑक्टोबर महिन्यात?

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा