Advertisement

मुंबईत पाणी तुंबल्यास पालिका अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई, मुख्यमंत्र्यांचे आयुक्तांना आदेश

गुरुवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी मिठी नदीची पाहणी केली.

मुंबईत पाणी तुंबल्यास पालिका अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई, मुख्यमंत्र्यांचे आयुक्तांना आदेश
SHARES

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुंबईतील नालेसफाई कामांचा आढावा घेतला.

नालेसफाई होऊनही मुंबईत पाणी तुंबते आणि मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे यंदा एखाद्या भागात पाणी तुंबल्यास संबंधित पालिका अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना दिले. त्या भागात काम करणाऱ्या कंत्राटदारावरही कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्री शिंदे यांनी मिठी नदीची पाहणी केली. यावेळी उपस्थित पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडून मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर वाकोला नाला, दादरमधील भूमिगत टाकी आणि वरळीतील लव्हग्रोव्ह सांडपाणी प्रक्रिया केंद्राचीही पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली.

या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी संबंधित पालिका अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबते आणि मोठा त्रास सहन करावा लागतो. याला नाल्यातील गाळ हे कारणही असते. मुंबईत एकूण दोन हजार २०० किलोमीटरचे नाले असून या नाल्यांची पूर्णपणे सफाईकामे झालीच पाहिजेत आणि ही कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांना केल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

नाल्यातून लाखो मेट्रीक टन गाळ काढला जातो. या सांख्यिकी माहितीऐवजी नालेसफाई खोलवर करा आणि कठीण खडक लागेपर्यंत माती व गाळ काढा. त्यामुळे पावसाळ्यात या नाल्यांमधून साचलेल्या पाण्याची वहनक्षमता वाढू शकेल, अशाप्रकारे नियोजन करण्याच्या सूचना केल्याचे ते म्हणाले. पाहणी दौरा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केला नाही, हेदेखील त्यांनी स्पष्ट केले.



हेही वाचा

हाय गर्मी! मुंबईत पारा 40च्या पार जाणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा