Advertisement

मुंबईतल्या ६२ खाजगी रुग्णालयात लसीकरण मोहीम सुरू

आज ७१ पैकी ६२ खासगी रुग्णालयात कोविड लसीकरण पुन्हा सुरू केलं जाणार आहे.

मुंबईतल्या ६२ खाजगी रुग्णालयात लसीकरण मोहीम सुरू
SHARES

राज्यात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे दिसत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरणावर भर देण्यात आला होता.

मात्र लशीचा साधा संपल्यामुळे काही काळासाठी लसीकरण हे थांबले होते. अखेर बृहन्मुंबई महानगरपालिकेला कोविड-19 लस साठा उपलब्ध झाला आहे. आज ७१ पैकी ६२ खासगी रुग्णालयात कोविड लसीकरण पुन्हा सुरू केलं जाणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेला कोविड-19 च्या लसीची नवी खेप उपलब्ध केल्यानंतर नंतर शहरात १२ एप्रिल आजपासून ७१ पैकी ६२ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण पुन्हा एकदा सुरू होईल. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितलं की, ४९ सरकारी केंद्रांवर लसीकरण सुरू आहे.

मुंबईमध्ये दररोज जवळपास ४० ते ५० हजार लोकांना लस दिली जात आहे. खासगी लसीकरण केंद्रांमध्ये लशीच्या कमतरतेमुळे १० आणि ११ एप्रिलला लसीकरण बंद होते. मात्र आता सोमवारपासून हे लसीकरण सुरू झाले आहे.


होम क्वारंटाईन आहात? मग 'ही' काळजी घेतली पाहिजे


दरम्यान राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाचे प्रमाण आणि साखळी खंडित करण्यासाठी राज्यव्यापी संपूर्ण लॉकडाऊनची आवश्यकता आहे, असं मत राज्य कोविड टास्क फोर्सच्या बहुंताश सदस्यांनी रविवारी व्यक्त केंलं. त्यामुळे बुधवार, १४ एप्रिल रोजी साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यात ८ ते १४ दिवसांचे लाॅकडाऊन लागण्याची दाट शक्यता आहे.

यावरच चर्चा करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी होते. बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, टास्क फोर्सचे सदस्य डाॅ. संजय ओक, डाॅ. शशांक जोशी, डाॅ. अविनाश सुपे, डाॅ. झहीर उडवाडिया, डाॅ. वसंत नागवेकर, डाॅ. राहुल पंडित, डाॅ. ओम श्रीवास्तव आदी सहभागी झाले होते.



हेही वाचा

आणखी ३ नवी कोरोना केंद्रे लवकरच सुरू होणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा