Advertisement

मुंबईतील निम्म्या गणेशोत्सव मंडपांना परवानगीच नाही


मुंबईतील निम्म्या गणेशोत्सव मंडपांना परवानगीच नाही
SHARES

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून मुंबईभर धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय. परंतु यातील निम्म्या मंडळांनी उभारलेल्या मंडपांना पोलीस आणि महापालिकेने परवानगीच दिलेली नाही, हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य होईल.

मुंबईतील २१२७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी केवळ ११६८ मंडळांनाच पोलीस आणि महापालिकेची परवानगी मिळालेली आहे. तर ३२३ मंडळांच्या अर्जांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर ६३६ मंडळांचे अर्ज परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.


डोक्यावर टांगती तलवार

मुंबईत गणेशोत्सव सुरू होऊ चौथा दिवस उलटला असला, तरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसमोर अजूनही परवानगीचे संकट डोक्यावर लटकलेले आहे. सोमवारी २८ ऑगस्टपर्यंत महापालिकेकडे २१२७ मंडळांनी अर्ज केले होते. त्यापैकी ११६८ मंडळांच्या अर्जांचा विचार करून पोलीस व वाहतूक पोलिसांच्या 'ना हरकत प्रमाणपत्रा' (एनओसी)नुसार महापालिकेने त्यांना परवानगी दिली आहे. तर ३२३ मंडळांचे अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत.


उपनगरातील मंडळाची संख्या अधिक

मुंबईतील चेंबूर, टिळक नगर येथील ५० मंडळ, मुलुंडमधील ४० मंडळ, बोरिवलीतील २३ मंडळ, कुर्ल्यातील २८ मंडळ, अंधेरी- जोगेश्वरी पूर्वेकडील ९२ मंडळांना अजूनही परवानगी मिळालेली नाही. वाहतूक पोलीस तसेच पोलिसांची 'एनओसी' न मिळाल्यामुळे महापालिकेच्यावतीने या मंडळांना परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र परवानगी मिळालेली नसली तरी मंडळांकडून गणेशोत्सव धडाक्यात साजरा केला जात आहे.

या सर्व मंडळांना वारंवार कल्पना देऊन आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. पोलीस व वाहतूक पोलिसांची 'एनओसी' मिळाल्यास त्यांना पुढील परवानगी दिली जाईल, असेही महापालिकेचे उपायुक्त आनंद वाघ्राळकर यांनी स्पष्ट केले.



हे देखील वाचा -

नालासोपाऱ्यात लहानग्यांचा गणेशोत्सव ठरतोय 'एकतेचं' प्रतिक



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)
  

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा