Advertisement

नालासोपाऱ्यात लहानग्यांचा गणेशोत्सव ठरतोय 'एकतेचं' प्रतिक


नालासोपाऱ्यात लहानग्यांचा गणेशोत्सव ठरतोय 'एकतेचं' प्रतिक
SHARES

एका बाजूला कट्टरपंथीयांकडून धर्माच्या नावाने तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असताना नालासोपाऱ्यातील हिंदू आणि मुस्लिम धर्माच्या मुलांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येत त्यांना आरसा दाखवण्याचे काम केले आहे. धार्मिक उत्सवातून द्वेष नव्हे, तर एकोपा, प्रेम आणि बंधुभाव जोपासला जातो हे देखील या मुलांनी दाखवून दिले आहे. 'पॉकिटमनी'तून जमा केलेली रक्कम आणि वर्गणी एकत्रित करून ही मुले यावर्षी गणेशोत्सव साजरा करत आहेत.


ठरले एकतेचे प्रतिक

नालासोपाऱ्यातील हनुमान नगरमधील मंगल प्लाझा कॉम्प्लॅक्स, शिवशक्ती दर्शन इमारतीतील १२ मुलांनी एकत्र येत गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. ही मुले १० ते १३ वयोगटातील असून त्यात ६ मुले मुस्लिम आहेत. सोसायटीच्या गार्डनमध्ये या मुलांचे लाडके गणराय विराजमान झाले आहेत.



अशी केली तयारी

या १२ मुलांनी सर्वप्रथम गणेशोत्सव साजरा करण्याचे एकमताने ठरवले. त्यासाठी खर्चाचा अंदाज काढण्यात आला. १२ जणांपैकी प्रत्येकाने घरातून मिळणाऱ्या 'पॉकिटमनी'तून पैसे जमा केले, त्यात वर्गणीतील पैशांची भर घातली. या एकत्रित रकमेतून लहानसा मंडप उभारला आणि त्यात गणरायाची प्रतिष्ठापना केली.


परिसरात चर्चेचा विषय

या मुलांचा गणेशोत्सव सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मुलांचे जाहीर कौतुक केले जात आहे. यापूर्वी या मुलांनी १५ ऑगस्ट रोजी झेंडा वंदन, दहीहंडीचे आयोजन देखील केले होते.



हे देखील वाचा -

बंधनात अडकले बाप्पा



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)
  

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा