Advertisement

बंधनात अडकले बाप्पा


बंधनात अडकले बाप्पा
SHARES

बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी भक्तांकडून त्याला हार, फुले, नारळ, पेढे, मोदकांचा नैवैद्य अर्पण करण्यात येतो. तर काही ठिकाणी 'नवसाला पावणारा गणपती' अशी ओळख मिळवणाऱ्या गणपतीला सोन्याची आभूषणेही चढवली जातात. एकप्रकारे भक्त आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी यासाठी बाप्पाला आपल्या ऐपतीनुसार आमिष दाखवू पाहतात.



त्याऐवजी मनात कुठलीही इच्छा न बाळगता गणरायाची खऱ्या भक्तीभावाने आराधना व्हावी या उद्देशाने गिरगावचे मूर्तीकार संदीप घोगे यांनी 'बंधना'त अडकलेल्या बाप्पाची मूर्ती साकारत भक्तांना संदेश देण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे. सिंहासनावर बसलेल्या या बाप्पांचे चारही हात बांधलेले आहेत. या मूर्तीची प्रतिष्ठापना घोगे यांनी गिरगाव खेतवाडीतील १० व्या गल्लीतील त्यांच्या निवासस्थानी केली अाहे.


आजकाल देवाचाही स्वार्थासाठी वापर केला जात आहे. माणूस जसजसा प्रगती करतोय, तसतसा तो धार्मिक गोष्टींमधील मूळ उद्देश विसरत चालला आहे. ही मूर्ती साकारताना कुठेही विडंबन करण्याचा किंवा कुणाच्या भावना दुखवण्याचा माझा हेतू नाही. या मूर्तीतून मी केवळ आजची वस्तुस्थिती मांडण्याचा, देवाचे दु:ख सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
- संदीप घोगे, मूर्तीकार, जी.आर.आर्ट



हे देखील वाचा -

बाप्पाच्या स्वागतासाठी त्यानं घरातच उभारलं 'शिवस्मारक'



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)
 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा