Advertisement

राज्यात कोरोनाने 24 तासात घेतले 27 जणांचे बळी, तर 678 नव्या रुग्णांची नोंद


राज्यात कोरोनाने 24 तासात घेतले 27 जणांचे बळी, तर 678 नव्या रुग्णांची नोंद
SHARES

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना, महाराष्ट्रात  रविवारी कोरोनाचे 678 नवे रुग्ण आढळून आले आहे. रविवारी 115 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात कोरोनाने बाधित 10 हजार 311 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर  रविवारी कोरोना या महामारीने 27 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने बाधित रुग्णांची संख्या 12 हजार 974 इतकी आहे.

राज्यभरात कोरोनाशी दोन हात करण्यात संपूर्ण प्रशासन व्यस्त आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या  1 लाख 70 हजार  नमुन्यांपैकी  1 लाख 56 हजार 248 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर  12 हजार 974 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख  81 हजार 382 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 13 हजार 158 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर शनिवारी या महामारीने राज्यभरात 27 जणांचा बळी घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोना या महामारीने मृत्य पावलेल्यांची संख्या आता 548 इतकी झाली आहे.

रविवारी मृत पावलेल्या 27 नागरिकांमध्ये मुंबईतील 21 रुग्णांचा समावेश आहे. तर पुणे शहरातील 4 आहेत. भिवंडीतील 1, नवीमुंबईतील 1 व्यक्तीचा समावेश आहे.  मृतांमध्ये 16 पुरुष तर 11 महिला आहेत. रविवारी झालेल्या 27 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 14 रुग्ण आहेत तर 10 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत.  या 27 रुग्णांपैकी 13 जणांमध्ये (48 टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा