Advertisement

राज्यात 539 केंद्रांच्या माध्यमातून 74 टक्के कोरोना लसीकरण


राज्यात 539 केंद्रांच्या माध्यमातून 74 टक्के कोरोना लसीकरण
SHARES

राज्यात आज 539 केंद्रांच्या माध्यमातून 40 हजार 539 (74 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात आज सर्वाधिक लसीकरण बीड जिल्ह्यात (131 टक्के) झाले असून त्या पाठोपाठ सातारा, धुळे, वर्धा, पालघर या जिल्ह्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झाले. राज्यात आतापर्यंत 2 लाख 61 हजार 319 कर्मचाऱ्यांना लसीकरण झाले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली.

आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी अशी (कंसात दैनंदिन लसीकरण झालेले कर्मचारी, टक्के आणि आतापर्यंतची एकूण संख्या): अकोला (420, 70 टक्के, 2699), अमरावती (945, 86 टक्के, 6195), बुलढाणा (533, 53 टक्के, 4950), वाशीम (287, 57 टक्के, 2492), यवतमाळ (495, 48 टक्के, 3661), औरंगाबाद (1480, 74 टक्के, 8142), हिंगोली (251, 50 टक्के, 2301), जालना (672, 84 टक्के, 5052), परभणी (191, 32 टक्के, 2440), कोल्हापूर (1386, 69 टक्के, 8446), रत्नागिरी (537, 63 टक्के, 3745), सांगली (788, 46 टक्के, 7024), सिंधुदूर्ग (394, 70 टक्के, 2523), बीड (1180, 131 टक्के, 6036), लातूर (902, 69 टक्के, 6259), नांदेड (702, 64 टक्के, 4543), उस्मानाबाद (641, 80 टक्के, 3554), मुंबई (1650, 53 टक्के, 11,523), मुंबई उपनगर (3860, 79 टक्के, 20778), भंडारा (575, 82 टक्के, 3170), चंद्रपूर (923, 84 टक्के, 5123), गडचिरोली (444, 63 टक्के, 4176), गोंदिया (511, 85 टक्के, 3284), नागपूर (1832, 61 टक्के, 12,234), वर्धा (1105, 100 टक्के, 7144), अहमदनगर (1785, 62 टक्के, 9704), धुळे (751, 107 टक्के, 5001), जळगाव (502, 46 टक्के, 5555), नंदुरबार (420, 60 टक्के, 3207), नाशिक (1839, 74 टक्के, 12052), पुणे (4108, 87 टक्के, 23,057), सातारा (1759, 110 टक्के, 10234), सोलापूर (14094, 75 टक्के, 10259), पालघर (1053, 88 टक्के, 5880 ), ठाणे (3590, 80 टक्के, 25824), रायगड (687, 86 टक्के, 3042) राज्यात सहा ठिकाणी को-वॅक्सीन लस देण्यात येत आहे. त्यातील अमरावती जिल्ह्यात आज 126 जणांना, औरंगाबाद 49, मुंबई 41, पुणे येथे 40, नागपूर 36, सोलापूर 09  असे 301 जणांना ही लस देण्यात आली. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा