अबब...शरीरात सापडल्या 75 टाचण्या

 Mumbai Central
अबब...शरीरात सापडल्या 75 टाचण्या

राजस्थानच्या बुंदी तालुक्यातील महिपुरा बस्ती येथे राहणाऱ्या बद्रीलाल यांच्या शरीरात जवळपास 75 पेक्षा जास्त टाचण्या असल्याचं समोर आलं आहे. 56 वर्षीय बद्रीलाल आठवड्यापूर्वी मुंबईच्या जगजीवन राम हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की, या टाचण्या फक्त शस्त्रक्रियेद्वारेच काढता येऊ शकतील. बद्रीलाल यांच्या घशाच्या भागात अंदाजे 40 पीन्स आहेत. तसंच, हात आणि पायांमध्येही टाचण्या आढळून आल्या आहेत. ही एक असाधारण केस असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. 

बद्रीलाल पश्चिम मार्गावरील ट्रेनसाठी पाणी सोडण्याचं काम करतात. एक्स-रेच्या अहवालानुसार, त्यांच्या शरीरात 75 टाचण्या आढळून आल्या आहेत. ज्यामुळे त्यांना 'टाचण्या खाणारी व्यक्ती’ असं नाव देण्यात आलं आहे. बद्रीलाल यांना राजस्थानमधील कोटा इथल्या एका रुग्णालयातून मुंबईतल्या रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यांच्या शरीरात सुमारे 75 टाचण्या आहेत. मान आणि वरच्या छातीमध्ये 40 टाचण्या आहेत. त्यांच्या उजव्या पायात 25 आणि उजव्या आणि डाव्या हातात 2-2 टाचण्या आढळून आल्या आहेत.

याविषयी जगजीवन राम हॉस्पिटलचे जनरल मेडिकल डिपार्टमेंटचे डॉ. सागर खाडे यांनी अंदाज व्यक्त केला की, ते कुठल्यातरी मांत्रिकाकडे वगैरे गेले असल्याची शक्यता आहे. पण त्या टाचण्या नेमक्या बद्रीलालच्या शरीरात कशा घुसल्या, याची माहिती अजूनही मिळालेली नाही.

बद्रीलालला काहीच आठवत नाही. त्यामुळे नेमकं कारण कळू शकलेलं नाही. याविषयी तज्ज्ञांशी बोलून पुढे काय उपचार द्यायचे ते ठरवणार आहोत. आम्ही बद्रीलाल यांना खूप प्रश्न विचारले पण त्यांनी काहीच उत्तरं दिली नाही. मग, आम्ही त्यांची चौकशी करून त्यांच्या काही टेस्ट केल्या. त्यानंतर त्यांच्या शरीरात असणाऱ्या टाचण्या दिसून आल्या. घशात दिसलेल्या टाचण्या काढण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागेल. बद्रीलाल यांच्या अनेक तपासण्या करण्यात आल्या. त्यांच्या गळ्याचा एक्स-रे ज्यावेळेस काढला तेव्हा अनेक टाचण्या त्यांच्या घशात आढळून आल्या. त्यानंतर त्यांच्या घशाचा, छातीचा, दोन्ही हातांचा, दोन्ही पायांचा एक्स-रे काढला गेला. त्या एक्स-रे मध्ये भरपूर टाचण्या आढळून आल्या. त्यांच्या शरीरात असलेल्या टाचण्या शस्त्रक्रियेद्वारेच काढता येतील. त्यासाठी इएनटी आणि छातीच्या विशेष तज्ञ्जांची मदत घेतली जाईल. बद्रीलाल यांच्या शरीरातून या टाचण्या काढणं हे आव्हान आहे.
डॉ. सागर खाडे, जनरल मेडिकल डिपार्टमेंट, जगजीवन राम हॉस्पिटल


Loading Comments