ठरलं! मुंबई पोलिसांची ड्युटी आता ८ तासांचीच!!

देवनारसह इतर ४५ पोलिस ठाण्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर मागील १ वर्षांपासून ८ तास ड्युटीचा उपक्रम सुरू करण्यात आला होता. प्रायोगित तत्वावर सुरू असलेल्या या उपक्रमाला आता मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि सहआयुक्त देवेन भारती यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे मुंबईतल्या सर्व पोलिस ठाण्यात ८ तास ड्युटी सुरू झाल्याने पोलिसांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

SHARE

कामाचा अतिरिक्त ताण, कमी संख्याबळ, बंदोबस्त, मोर्चे, आंदोलने अशा सततच्या ड्युटीमुळे पोलिस विविध आजारांनी त्रस्त झालेत. त्यामुळेच पोलिस कर्मचाऱ्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांच्या परवानगीने देवनारसह इतर ४५ पोलिस ठाण्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर मागील १ वर्षांपासून ८ तास ड्युटीचा उपक्रम सुरू करण्यात आला होता. प्रायोगित तत्वावर सुरू असलेल्या या उपक्रमाला आता मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि सहआयुक्त देवेन भारती यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे मुंबईतल्या सर्व पोलिस ठाण्यात ८ तास ड्युटी सुरू झाल्याने पोलिसांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.


८ तासांच्या ड्युटीचा ६ महिने अभ्यास

देवनार पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई रवी पाटील यांनी या ८ तास ड्युटीच्या उपक्रमावर ६ महिने अभ्यास केला होता. राखीव पोलिस दलाची मदत घेतल्यास सर्व पोलिस ठाण्यांत ८ तास ड्युटी शक्य असल्याचं सादरीकरण त्यांनी पोलिस आयुक्तांकडे केलं होते. हा उपक्रम सुरू केल्यास पोलिस कर्मचा‍ऱ्यांना मानसिक आणि कौटुंबिक समाधान मिळेल. आनंददायी वातावरणामुळे पोलिस सक्षमरित्या त्यांच्या जबाबदा‍ऱ्या नित्यनियमाने पार पाडतील, असं या सादरीकरणात नमूद करण्यात आलं. त्यानुसार पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी पुढाकार घेऊन, देवनार पोलिस ठाण्यात पहिल्यांदा हा उपक्रम सुरू केला.टप्प्याटप्प्याने विस्तार

काही महिन्यांनी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली टप्प्याटप्प्याने विविध पोलिस ठाण्यात हा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झालं. त्यामुळेच ८ तास ड्युटी या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी पोलिस आयुक्तांनी स्वतः देवनार पोलिस ठाण्याची भेट घेत पोलिसांना शुभेच्छा दिल्या. इतरही पोलिस ठाण्यात ८ तास ड्युटीचा उपक्रम लवकरच सुरू करण्यात येईल, पोलिस ठाणे पातळीवर हा उपक्रम सुरळीत सुरू झाल्यानंतर अधिकाऱ्यांना देखील या उपक्रमात समाविष्ट करून घेण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केलं.


पाठपुराव्याला यश

त्यानुसार सोमवारी पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि सह पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी सर्व पोलिस ठाण्यात ८ तास ड्युटीचा उपक्रमाला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे मुंबई पोलिस दलातील अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या ८ तास ड्युटीसाठी मागील २ वर्षांपासून पोलिस पत्नी संघाच्या राजश्री पाटील आणि महाराष्ट्र पोलिस बाॅईज संघटेचे राहुल दुबाले पाठपुरावा करत होते.हेही वाचा-

दिव्याखाली अंधार! आयएएस-आयपीएस रहिवासी टाॅवरमध्येच चालतो वेश्याव्यवसाय!!


संबंधित विषय
ताज्या बातम्या