Advertisement

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ८२ टक्के पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अधूनमधून दमदार पाऊस कोसळत असल्याने मंगळवारी सातही धरणांत ८२ टक्के पाणीसाठा जमा आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ८२ टक्के पाणीसाठा
SHARES

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अधूनमधून दमदार पाऊस कोसळत असल्याने मंगळवारी सातही धरणांत ८२ टक्के पाणीसाठा जमा आहे. यामुळे मुंबईत सुरू असलेले २० टक्के पाणीकपातीचे संकट दूर होण्याची शक्यता आहे.


मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. आता सातही धरणांत ८२.९५ टक्के म्हणजेच १२ लाख ६४२ दशलक्ष लीटर पाणीसाठा जमा झाला आहे. २०१९ मध्ये आजच्याच दिवशी ९४.२० टक्के म्हणजेच १३ लाख ६३ हजार ४०३ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होता. २०१८ मध्ये १२ लाख १८ हजार २२२ इतका म्हणजेच ९१.०८ टक्के पाणीसाठा जमा होता. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी धरणात पाणीसाठा कमी आहे.


तलाव क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत तलावांतील पाणीसाठा १३ लाख दशलक्ष लिटरवर जाण्याचा अंदाज आहे.  या तलावांची पाणी साठवणक्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर एवढी आहे. त्यातील १३ लाख दशलक्ष लिटर पाण्याची पातळी गाठल्यानंतर मुंबईतील २० टक्के पाणीकपात मागे घेतली जाईल.


हेही वाचा -

हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंविरोधात पुरावे द्या, राऊतांचं भाजपला आव्हान

मग, संजय राऊत बोलत असल्यानेच संशय वाढलाय- नारायण राणे




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा