Advertisement

धरणांमध्ये ८२ टक्के पाणीसाठा; वर्षभराच्या पाण्याचा प्रश्न सुटला


धरणांमध्ये ८२ टक्के पाणीसाठा; वर्षभराच्या पाण्याचा प्रश्न सुटला
SHARES

मुंबईसह राज्यभरात यंदा चांगला पाऊस झाल्याने सर्वच प्रादेशिक विभागांतील धरणांत चांगला जलसाठा झाला आहे. राज्यातील लघू, मध्यम आणि मोठ्या अशा सर्व धरणांत सध्या एकूण ८२.३६ टक्के पाणीसाठा असून गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात ११ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.  हवामान विभागाने यंदा चांगल्या पावसाचे भाकीत वर्तवले होते.

जूनमध्ये पावसानं काही काळ दडी मारल्यानंतर जुलै, ऑगस्ट या महिन्यांत चांगला पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील १४१ मोठ्या धरणांत ९२ टक्के पाणीसाठा झाला आहे. राज्यातील सर्वात मोठे असे उजनी धरण १०० टक्के भरले असून कोयना धरणातही ९९.७२ टक्के  पाणीसाठा झाला आहे, तर मराठवाड्यातील जायकवाडी धरणातही ९९.७७ टक्के  पाणीसाठा झाला आहे. तसेच राज्यातील २५८ मध्यम धरणांमध्ये ७५.५२ टक्के  पाणीसाठा झाला आहे.

राज्यात २८६८ लघू प्रकल्पांमध्ये मात्र पाणीसाठय़ाचे प्रमाण तुलनेत कमी असून त्यात ४०.१३ टक्के  पाणीसाठा झाला आहे. मोठे, मध्यम व लघू अशा सर्व धरणांतील पाणीसाठ्याचा विचार करता राज्यातील एकूण ३२६७ धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता ४० हजार ७९२ दलघमी असून २० सप्टेंबरअखेर ३३ हजार ५९७ दलघमी पाणीसाठा झाला आहे. हे प्रमाण ८२.३६ टक्के  असून मागच्या वर्षी याच काळात ७१.५ टक्के  पाणीसाठा होता.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा