Advertisement

मुंबईत ८ हजार ४७९ नव्या रुग्णांची नोंद, १०० सक्रिय सीलबंद इमारती

मुंबईत गेल्या २४ तासांत ८ हजार ४७९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ही आता ५ लाख ७९ हजार ३११ इतकी झाली आहे.

मुंबईत ८ हजार ४७९ नव्या रुग्णांची नोंद, १०० सक्रिय सीलबंद इमारती
SHARES

मुंबईत (mumbai) गेल्या २४ तासांत ८ हजार ४७९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या कोरोना (coronavirus) रुग्णांची संख्या ही आता ५ लाख ७९ हजार ३११ इतकी झाली आहे. शिवाय, मुंबईतील सक्रीय सीलबंद इमारतींची संख्या १०० वर गेली आहे. मुंबईत सध्या १०० सक्रीय सीलबंद इमारती आहेत. मुंबईत रविवारी ८ हजार ७८ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ५३ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.

मुंबईत रविवारी ४६ हजार ९७१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा ८२ टक्के इतका आहे. ११ एप्रिल ते १७ एप्रिलपर्यंत मुंबईचा विचार केला असता मुंबईत एकूण रुग्ण वाढीचा दर हा १.५३ टक्के इतका आहे. मुंबईत १०० सक्रिय सीलबंद इमारती आहेत. त्याचप्रमाणे १ हजार १८८ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. मुंबईत आतापर्यंत ४९ लाख ४५ हजार ९७६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत रुग्णसंख्या वाढत असली तरी मुंबईत कोरोनामुळं होणारे मृत्यू हे तुलनेने कमी आहेत.

मुंबईत आतापर्यंत १२ हजार ३४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणं मुंबईसह राज्यातही (maharashtra) ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. मुंबईतही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मुंबईतील विविध ६ रुग्णालयातील १६८ रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले आहे. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशी रुग्णांना पालिकेच्या इतर कोविड सेंटरमध्ये भरती करण्याचे काम करण्यात आले.

वांद्रे आणि कुर्ला येथील भाभा रुग्णालय, बोरिवलीतील भगवती, गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय, मुलुंडचे एम.टी. अग्रवाल आणि जोगेश्वरीतील ट्रॉमा रुग्णालयामधून  १६८ रुग्णांना पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये भर्ती करण्यात आले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा