Advertisement

गोव्यातून विनापरवाना 1 बॉटल दारू आणल्यास मोक्का लागणार

मद्यप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी आहे.

गोव्यातून विनापरवाना 1 बॉटल दारू आणल्यास मोक्का लागणार
SHARES

मद्यप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी आहे. आता गोव्यातून विनापरवाना एक बाटली दारु आणली तरी थेट मोक्का लावणार, असल्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिला आहे.

एकच व्यक्ती तीन वेळा अशा प्रकारच्या गुन्ह्यात सापडल्यास मोक्का लावणार असल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे. गोव्यातून अवैधरित्या आणल्या जाणाऱ्या मद्य वाहतुकीला चाप लावण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना यासंदर्भात कारवाईच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

शंभूराज देसाई म्हणाले की, मी यासंदर्भात आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. तीन वेळा जर एकाच व्यक्तीकडून अशा पद्धतीचा गुन्हा घडला तर मोक्का लावता येईल का हे तपासून त्यांच्यावर मोक्का लावला जाईल, असं देसाई म्हणाले.

गोवा राज्याला त्यांच्या राज्यात परमिट देण्याचा अधिकार आहे. आमच्या राज्यात परमिट देण्याचा अधिकार त्यांना नाही. त्यांनी दारु घ्यायची आहे त्यांनी गोव्यात ती घ्यावी, असंही देसाई यावेळी म्हणाले.हेही वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात, धक्कादायक कारणाचा खुलासा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा