मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात, धक्कादायक कारणाचा खुलासा

पिंपरी-चिंचवडमधील नाशिक फाटा येथून लोणावळा पोलिसांनी त्याला अटक केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात, धक्कादायक कारणाचा खुलासा
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

पोलीस नियंत्रण कक्षाला मुख्यमंत्री शिंदेंच्या हल्ल्याचा कट रचला जात असल्याची माहिती या तरूणाने दिली होती. पिंपरी-चिंचवडमधील नाशिक फाटा येथून लोणावळा पोलिसांनी ३६ वर्षीय अविनाश अप्पा वाघमारेला ताब्यात घेतलं होतं.

मूळचा घटकोपर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकरनगरमधील साठे चाळीतील रहिवाशी असलेल्या वाघमारेने पोलिसांना असा फोन का केला ही माहिती धक्कादायक आहे.

लोणावळ्यातील एका हॅाटेलमध्ये रविवारी (२ ऑक्टोबर) दुपारी वाघमारे हा जेवणासाठी आला होता. त्यावेळी त्याने हॅाटेलमध्ये दारु प्यायली. नंतर दारुच्या नशेतच त्याने पिण्याच्या पाण्याच्या बाटलीवरुन हॉटेल मालकाशी वाद घातला.

पाण्यावरुन झालेल्या वादातून हॉटेल चालकाला त्रास देण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या १०० या आप्तकालीन क्रमांकावर फोन करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला जात असल्याचा बनावट माहिती देणारा फोन अविनाशने केला. लोणावळ्यामधील याच हॉटेलमधून अविनाशने हा फोन केला होता.

हॉटेल मालक किशोर पाटील यांनी घडलेल्या प्रकारासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. “तो (आरोपी अविनाश) मुंबईवरुन कवठेमहांकाळ चालला होता. तो इथं आला हॉटेलला जेवला. त्याला थंड पाणी हवं होतं. मात्र आमच्याकडे थंड पाणी त्यावेळी नव्हतं. त्यावरुन त्याने वाद घातला,” असं पाटील यांनी सांगितलं.
पोलीस यंत्रणा आणि हॉटेल चालकाला त्रास दिल्याबद्दल पोलिसांनी अविनाश वाघमारेविरोधात कलम १७७ अंतर्गत लोणावळा पोलीस स्थानकामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अविनाश वाघमारेच्या पत्नीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “तो मानसिक दृष्ट्या अस्थिर आहे. त्याचं डोकं चालत नाही. तो फार मद्यपान करतो,” असं सांगितलं. “मामाचं निधन झाल्याने तो गावी चालला होता. पाण्याच्या बाटलीवरुन काहीतरी वाद झाला म्हणून त्यांनी खोटा कॉल केला. मानसिक दृष्ट्या अस्थिर असल्याचं सांगून पोलिसांनी चौकशीनंतर त्याला सोडून दिलं आहे,”हेही वाचा

मध्य रेल्वेचा अधिकारी लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात

महिलांच्या बाथरूममध्ये डोकावणाऱ्या आयआयटी बॉम्बे कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला अटक

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा