Advertisement

वांद्रे येथे भीषण आग, ४ सिलेंडरचा स्फोट


वांद्रे येथे भीषण आग, ४ सिलेंडरचा स्फोट
SHARES

वांद्रे येथील माऊंटमेरी परिसरातील तबेल्याला आज सकाळी साडे अकराच्या सुमारासस आग लागली. आग कशी लागली याबाबत अद्याप कोणतिही माहिती कळू शकली नसली. तरी या आगीत आतापर्यंत ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याचे पुढे आले आहे. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मुंबईत ऐकीकडे प्रशासन कोरोनाशी दोन हात करत असताना. वांद्रेच्या माऊंटमेरी परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. त्या ठिकाणच्या तबेला परिसरात ही आग लागल्याचे कळते. या आगीत ४ सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे क्षणार्धात आगीने रौद्र रुप धारण केले आहे. आगीची माहिती मिळताच वांद्रे अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे ४ इंजिन आणि ४ टॅकर घटनास्थळी दाखल झाले आहे. आग लागलेल्या परिसर हा दाटीवाटीचा असल्यामुळे आग विझवताना अग्निशमन दलाला असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. चिंचोळ्या गल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहचता येत नसल्याचे कळते. 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा