Advertisement

दोन डोस न घेता सार्वजनिक ठिकाणी जाताय? 'इतका' दंड आकारणार

मुंबईतील मॉल, रेस्टॉरंट, रेल्वे, सार्वजनिक वाहतूक इथं लसीचे दोन डोस न घेता जाताय? मग जरा थांबा...

दोन डोस न घेता सार्वजनिक ठिकाणी जाताय? 'इतका' दंड आकारणार
SHARES

मुंबईतील मॉल, रेस्टॉरंट, रेल्वे, सार्वजनिक वाहतूक इथं लसीचे दोन डोस न घेता जाताय? मग जरा थांबा... लसीचे डोस असणाऱ्यांनाच आता सार्वजनिक ठिकाणी प्रवेश मिळणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी जर कोरोना लसीचे दोन डोस न घेतलेली व्यक्ती आढळल्यास त्याला १० हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात येणार आहे, असं वृत्त एका चॅनलनं दिलं आहे. 

दरम्यान, १० नोव्हेंबरपासून दक्षिण अफ्रिकेतून मुंबईत आलेल्या १ हजार १२६ प्रवाशांचा शोध सुरू आहे. त्यांची कोविड टेस्ट केली जाणार आहे. दरम्यान, यांना ट्रॅक केल्यानंतर त्यांची कोविड टेस्ट करून पॉझिटीव्ह आढळल्यास जीनोम सिक्वेंसिंगही केलं जाणार आहे.

तसंच दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्या विमानांबाबत निर्णय घेऊन संस्थात्मक विलगीकरणाची नवी पॉलिसी केंद्रानं बनवावी अशी विनंतीही केंद्राकडे केल्याची माहिती पालिका आयुक्त चहल यांनी दिली.

दुसऱ्या डोसची मुदत उलटून गेल्यानंतरही ज्यांनी अद्याप लस घेतली नाही त्यांच्यासाठी लसीकरण मोहिम वेगानं राबवलं जाणार आहे. तसंच मुंबईसाठी विशेष बदल म्हणून पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतरही कमी करण्याची मागणी केंद्राकडे केली आहे, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे.

दरम्यान, आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना आता १४ दिवस क्वॉरंटाईन केलं जाणार आहे. त्यांची दर ४८ तासांनी कोरोना टेस्ट केली जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर मुंबई विमानतळावर बंदी घालण्याची मागणी आज केंद्र सरकारकडे राज्यानं केली आहे.

विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जाणार आहे. जर एखाद्या व्यक्तीनं गेल्या १४ दिवसांत आफ्रिकेतील कोणत्या देशाचा दौरा केला असेल तर त्याचीही तपासणी केली जाणार आहे.हेही वाचा

Omicron Scare: झांबियाहून पुणे वाया मुंबई, आता चाचणी पॉझिटिव्ह

पालिका कार्यालयात १ जानेवारीपासून बायोमेट्रिक हजेरी लागणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा