Advertisement

पालिका कार्यालयात १ जानेवारीपासून बायोमेट्रिक हजेरी लागणार

पालिका १ जानेवारी २०२२ पासून ही प्रणाली पुन्हा सुरू करणार आहे.

पालिका कार्यालयात १ जानेवारीपासून बायोमेट्रिक हजेरी लागणार
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिके (BMC) मध्ये बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली असेल. पालिका १ जानेवारी २०२२ पासून ही प्रणाली पुन्हा सुरू करणार आहे.

प्रशासकिय संस्थेनं गेल्या आठवड्यात मुंबईतील त्यांच्या सर्व कार्यालयांना एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार बायोमेट्रिक मशीन कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करत असल्याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

महापालिकेत १ लाख कर्मचारी आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात मुख्यालय, २४ प्रशासकीय वॉर्ड कार्यालये आणि इतर केंद्रीय एजन्सी कार्यालयांमध्ये कार्यरत आहेत.

परिपत्रकात म्हटलं आहे की 'ब्रेक द चेन' मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व सरकारी आस्थापनांना १००% उपस्थिती ठेवण्यास सांगितलं जातंय.

एचओडींना ३१ डिसेंबरपूर्वी त्यांच्या कार्यालयात सर्व बायोमेट्रिक प्रणाली पूर्णपणे कार्यरत असल्याची खात्री करण्यास सांगितलं आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक मशिनजवळ सॅनिटायझर ठेवण्यास सांगितलं आहे. परिपत्रकात असंही नमूद केलं आहे की, अधिका-यांनी सामाजिक अंतर पाळले जाईल याची खात्री करणे आवश्यक आहे.

१६ मार्च २०२० पासून कोविड-१९ चा प्रादुर्भाव झाल्यापासून पालिकेनं सर्व कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी बंद केली होती. बायोमेट्रिक मशिनमुळे कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतला होता.हेही वाचा

महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'या' आहेत गाईडलाईन्स

मुंबईत १५ डिसेंबरपासून सुरू होणार १ली ते ७वीचे वर्ग

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा