Advertisement

नाहीतर आम्ही संपावर जाऊ, ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचा इशारा

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बिबट्या सेटवर प्रवेश करताना दिसतोय. पहा व्हिडिओ

नाहीतर आम्ही संपावर जाऊ, ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचा इशारा
SHARES

मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटी येथील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेच्या (Marathi TV serial Sukh Mhanje Nakki Kay Asta) सेटवर चक्क बिबट्या आल्याची घटना समोर आली आहे.

बिबट्याचे बछडे मालिकेच्या सेटवर फिरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बिबट्या सेटवर प्रवेश करताना दिसतोय. बिबट्याला पाहताच सेटवर एकच गोंधळ उडतो आणि सेटवरील लोक सैरावैरा धावायला लागतात. बिबट्यापासून वाचण्यासाठी लोक धडपड करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

...तर कामबंद आंदोलन

"सेटवर 200 हून अधिक लोक उपस्थित होते. या साऱ्या गोंधळात एखाद्याचा जीवही गेला असता. मागील 10 दिवसांमध्ये असा प्रकार तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा घडला आहे. सरकारने यासंदर्भात काहीतरी कठोर कारवाई केली पाहिजे," असं या घटनेनंतर 'ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन'चे अध्यक्ष सुरेश श्यामल गुप्ता यांनी म्हटलं आहे. या परिसरामधील बिबट्यांचा वावर असूनही त्याकडे सरकार फार काळजीपूर्वपणे लक्ष देताना दिसत नसल्याची खंतही गुप्ता यांनी व्यक्त केली.

"सरकारने तातडीने सुरक्षेसंदर्भातील पावलं उचलली नाहीत तर फिल्म सिटीमधील हजारो कर्मचारी आणि कलाकार संपावर जातील," असा इशारा गुप्ता यांनी दिला आहे.

'अंजुनी' या मालिकेच्या सेटवर 18 जुलै रोजी बिबट्या दिसला होता. त्यानंतर आता थेट सेटवर शुटींग सुरु असतानाच बिबट्या आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यावेळेस सेटवर 200 कर्मचारी होते. या बिबट्याने सेटजवळच्या एका कुत्र्यावरही हल्ला केल्याचं सांगण्यात आलं आहे. या घटनेनंतर अनेक वन अधिकाऱ्यांनी या सेटला आणि बिबट्या दिसला त्या ठिकाणाला भेट दिली होती. त्यांनी परिस्थितीची पहाणी केली होती. 

मुंबईमधील फिल्म सिटीमध्ये अनेक मालिका आणि चित्रपटांचं शुटींग होतं. फिल्म सिटी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेला लागून आहे. तसेच येथून जवळच आरे मिल्क कॉलिनीही आहे. मुंबईमधील हा जंगलांचा राखीव भाग आहे.  मागील काही काळापासून सातत्याने या ठिकाणी बिबट्याचं दर्शन होत असल्याने शुटींग करणं जिकरीचं काम झालं आहे. या ठिकाणी अनेकदा बिबट्या दिसून आल्याने कलाकारांबरोबर कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचं वातावरण आहे.



हेही वाचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! गुरुवारी रेड अलर्ट जारी

India Vs Pakistan Match Date : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तारीख बदलण्याची शक्यता

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा