Advertisement

पुरात अडकलेल्यांना वाचवताना पोलीस अधिकाऱ्याचा हार्टअटॅकने मृत्यू

विशाल राजवाडे हे रात्रभर उरण भागातील चिरनेर भागात पुरग्रस्तांना मदत करत होते.

पुरात अडकलेल्यांना वाचवताना पोलीस अधिकाऱ्याचा हार्टअटॅकने मृत्यू
SHARES

गेल्या तीन दिवसांत महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये अनेकांचे जीव गेले. उरण पोलीस ठाण्यात ड्युटीवर असणारे पोलीस उपनिरीक्षक विशाल राजवाडे यांचे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना हार्टअटॅक आला. विशाल राजवाडे हे रात्रभर उरण भागातील चिरनेर भागात पुरग्रस्तांना मदत करत होते.

मंगळवारी चिरनेर भागात पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. स्वतः फिल्डवर उतरून विशाल राजवाडे हे पूरग्रस्तांना मदतीचा हात देत होते. त्याचवेळी त्यांना हदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.

मदतकार्य सुरु असताना विशाल राजवाडे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना डॉक्टरांकडे नेले त्यानंतर पोलिसांनी विशाल राजवाडे यांना मुंबई येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.



हेही वाचा

Kalyan Baby Rescue : रेल्वे ट्रॅकजवळील नाल्यात पडलेल्या चिमुकल्याची शोध मोहीम थांबवली

जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना मुंबईचे विजय कोकरे हुतात्मा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा