Advertisement

Kalyan Baby Rescue : रेल्वे ट्रॅकजवळील नाल्यात पडलेल्या चिमुकल्याची शोध मोहीम थांबवली

बुधवारी हे बाळ नाल्यात पडले होते. त्यानंतर NDRF जवानांनी शोध मोहीम राबवली होती. गेले दोन दिवस बाळाचा शोध घेतला जात होता.

Kalyan Baby Rescue : रेल्वे ट्रॅकजवळील नाल्यात पडलेल्या चिमुकल्याची शोध मोहीम थांबवली
SHARES

बुधवारी कल्याण खाडीत सहा महिन्याचे बाळ वाहून गेल्याच्या घटनेवर सर्वांनीच हळहळ व्यक्त केली. बाळ मिळावे यासाठी सर्वच जण प्रार्थना करत होते. NDRF टीमने बाळाला शोधण्याचा अतोनात प्रयत्न केला. गेले दोन दिवस सर्च ऑपरेशन सुरू होते. पण अखेर आज हे ऑपरेशन थांबवण्यात आले आहे. 

एनडीआरएफचे निरीक्षक योगेश कुमार म्हणाले की शोध मोहीम आता अधिकृतपणे थांबवण्यात घेण्यात आली आहे.

“गुरुवारी सकाळी 11 वाजता, बोटीसह 20 सदस्यांच्या टीमने बुधवारी जिथे बाळ बेपत्ता झाले त्या ठिकाणी शोध सुरू घेतला. आम्ही मुंब्रा पर्यंत खाडीत पुढे निघालो. आमचे लक्ष्य खारफुटी आणि झाडांवर होते. कारण तेथे बाळ अडकले असण्याची शक्यता होती,” एनडीआरएफ कॉन्स्टेबल मयूर ढोले यांनी व्यक्त केली.

बाळाचे मामा नरेन पोगुल यांनी हिंदुस्थान टाईम्सला म्हणाले, “माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना धक्का बसला आहे. माझ्या बहिणीला हरवलेल्या मुलीचे दुःख सहन करता आले नाही आणि ती आजारी पडली. बाळाला ताप आला होता आणि म्हणून माझ्या वडिलांनी तिला रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र हा दुर्दैवी प्रकार कसा घडला हे समजू शकले नाही. आम्‍ही सर्वांना विनंती करतो की आम्‍हाला  एकटे सोडावे.”

बुधवारी भिवंडी येथे एक महिला तिचे वडील आणि सहा महिन्यांच्या मुलीसह कल्याणहून जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढले. ठाकुर्ली स्थानकानंतर गाडी थांबल्यावर दोघांनी उतरण्याचा निर्णय घेतला आणि कल्याणपर्यंत रुळांवर चालत निघाले. एका नाल्यावरील अरुंद पाईप ओलांडताना बाळ चुकून तिच्या आजोबांच्या तावडीतून निसटले आणि वाहून गेले.

मुलीचे आजोबा ज्ञानेश्वर पोगुल म्हणाले, “मी स्वत:ला दोष देतो आणि माझ्या हातातून बाळ पडल्याचा विचार माझ्या मनातून काढू शकत नाही. मला वाटले की माझी मुलगी रुळावरून चालताना मुलाला हाताळू शकत नाही आणि म्हणून मी तिच्याकडून बाळ घेतले. पण दुर्दैवाने ती माझ्या हातातून निसटली. "माझी मुलगी अजूनही आशा करते की कोणीतरी तिच्या मुलाला परत आणेल," ते पुढे म्हणाले.

योगिता रुमाल (३०) असे या महिलेचे नाव असून ती मूळची हैदराबादची असून ती आपल्या बाळाच्या हृषितावर केईएम आणि वाडिया रुग्णालयात उपचारासाठी मुंबईत होती.



हेही वाचा

जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना मुंबईचे विजय कोकरे हुतात्मा

स्लॅब कोसळल्याने माहीमच्या इमारतीतून 19 कुटुंबांचे स्थलांतर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा