SHARE

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र त्वरीत मिळण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना e-Tribe पोर्टलवर https://www.etribevalidity.mahaonline.gov.in ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्राधान्याने वैधता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल. असं आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविलं आहे.दूरध्वनीवरुन मार्गदर्शन 

संबंधित समितीच्या पोलीस दक्षता पथकाला देखील गृह व शालेय चौकशीची व कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे हेल्पलाईन नं. ०२२ - २६३६०९४१ सुरु करण्यात अाली अाहे. सकाळी  ९ ते  ते ७ या कालावधीत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दूरध्वनीवरुन वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन होईल. सर्व म्हणजे आठही अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांमध्ये या विद्यार्थ्यांसाठी विशेष कक्षामार्फत आवश्यक ती माहिती पुरविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.


दैनंदिन आढावा

या मोहिमेच्या कामकाजाचा वरिष्ठ व अति वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दैनंदिन आढावा घेतला जाईल. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना त्वरीत वैधता प्रमाणपत्र मिळण्याच्या दृष्टीने सर्व प्रक्रिया पूर्ण करुन आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच समित्यांच्या स्तरावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरध्वनी सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ठाणे विभाग (ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालय, वर्तकनगर, ठाणे (पश्चिम), ठाणे, दूरध्वनी क्र.  ०२२ - २५८८३५०३हेही वाचा -

आता, व्हाॅट्सअॅपवरून पाठवता येईल नोटीस!

वांद्रे टर्मिनस ते जबलपूरदरम्यान धावणार विशेष सुपरफास्ट गाडी


 

संबंधित विषय
ताज्या बातम्या