Advertisement

लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडली बॅग


लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडली बॅग
SHARES

हार्बर मार्गावरून अंधेरी ते सीएसटी मार्गे प्रवास करणाऱ्या महेश जासलाल दास यांची प्रवासादरम्यान वडाळा रोड स्थानकात बॅग विसरली. त्या प्रवाशाला त्याची बॅग मिळवून देण्यात वडाळा लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. या बॅगेत 65 हजार रुपये किंमतीचे साहित्य होते.

गोरेगाव येथे रहाणारे महेश जासलाल दास सोमवारी नेहमीप्रमाणे अंधेरी लोकलने प्रवास करत होते. परंतु सदर लोकल सीएसटीऐवजी वडाळा रोड स्थानकापर्यंतच असल्याने त्यांना वडाळा रोड स्थानकातील फलाट क्रमांक 3 वरून सीएसटीकडे जाणारी लोकल पकडण्यासाठी फलाट क्र. 4 वर जावे लागले. दरम्यान, लोकलची वाट बघत ते स्थानकात बसले होते. लोकल येताच ते बॅग विसरून त्या लोकलमध्ये चढले. सीएसटी स्थानकात पोहचताच लोकलमधून उतरतेवेळी त्यांनी बॅग शोधली. मात्र बॅग सापडली नसल्याने बॅग चोरीला गेल्याचा गैरसमज झाला. त्यामुळे सीएसटी स्थानकात ते याबाबत तक्रार नोंदवण्यासठी गेले होते. 

दरम्यान, वडाळा रोड स्थानकात गस्त घालणाऱ्या पोलीस शिपाई श्रीकांत भोसले, सागर दुशिंगे, अजित रूपवनवर, योगेश कदम या पथकाला एक अनोळखी बॅग दिसल्याने त्यांनी ती बॅग ताब्यात घेऊन एएसआय उत्तम कुंभार यांच्या सहकार्याने तपासली असता त्यामध्ये 55 हजार रुपये किंमतीचे सोने (आंगठी, कर्णफुले, चेन, मंगळसूत्र) आणि 10 हजार रुपये रोख रक्कम तसेच महत्त्वाची कागदपत्रे असा एकूण 65 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळाला. याबाबत सीएसटी स्थानकातील रेल्वे पोलिसांना वडाळा लोहमार्ग पोलिसांनी एक बॅग वडाळा स्थानकात आढळून आल्याचे कळवले. त्यानुसार महेश जासलाल दास यांना सीएसटी पोलिसांनी वडाळा स्थानकात जाण्यास सांगितले. ही बॅग दास यांचीच आहे का याची खातरजमा करून पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत घुटुकडे यांचे हस्ते दास याना सुपूर्द करण्यात आली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा