Advertisement

मुंबई विद्यापिठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताह


मुंबई विद्यापिठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताह
SHARES

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल 2017 रोजी 126 वी जयंती भारतासह जगभरात साजरी होत आहे. त्यानिमित्ताने सरकारच्या वतीने शासन, स्वंयसेवी संस्था, शिक्षण संस्थानी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. मुंबई विद्यापिठात यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 

10 एप्रिलला सकाळपासूनच विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली. ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ चित्रांचे आणि छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. विद्यापिठाचे कुलगुरू संजय देशमुख यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. गायक प्रवीण जोंधडे यांनी 'गाथा भिमाची' या कार्यक्रमाचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. आठवडाभर सुरू राहणाऱ्या जयंती सप्ताहात अनेक व्याख्यान, कविसंमेलन, परिसंवाद, चित्र प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद रसिकांना घेता येणार आहे.

शैक्षणिक क्षेत्रात बाबासाहेबांनी दिलेले योगदान महत्वाचे आहे. त्यांनी स्थापन केलेले सिद्धार्थ महाविद्यालय आणि त्यांनी प्राचार्य पद भूषविलेले विधी महाविद्यालय ही मुंबईतील दोन्ही महाविद्यालये सामाजिक परिवर्तनाला गती देणारी केंद्रे ठरली आहेत.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा