Advertisement

आता चेहऱ्याने आधार पडताळणी, १ जुलैपासून अंमलबजावणी


आता चेहऱ्याने आधार पडताळणी, १ जुलैपासून अंमलबजावणी
SHARES

बँक खाती, मोबाईल नंबर, वीमा पॉलिसी किंवा कोणताही व्यवहार असो त्याला आधारशी संलग्न करण्याची नागरिकांनी सवयच लावून घेतली आहे. पण सर्व सरकारी आणि बँकिंग सेवा आधारशी  संलग्न केल्यानंतर त्याच्या पडताळणीसाठी अनेक ठिकाणी बोटांचे ठसे घेतले जातात. अनेकदा ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे उमटत नाही. त्यामुळे आता वैधता तपासणीसाठी चेहऱ्याचा निकष वापरण्याचा निर्णय विशेष ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय)ने घेतला आहे. देशभरात ही सुविधा १ जुलैपासून सुरू होणार आहे.  


म्हणून घेतला हा निर्णय

कोणताही व्यवहार आधारशी संलग्न केल्यानंतर वैधता तपासणीसाठी बोटांचे ठसे घेतले जातात. पण ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे नीट उमटत नाहीत. त्यामुळे त्यांची ओळख पडताळणी करताना अडचणी येतात. या अडचणी टाळण्यासाठी चेहरा पडताळीची पद्धत वापरल्यास फायदा होईल, असं यूआयडीएआयने स्पष्ट केलं.    



३१ मार्चपर्यंत वाढवली होती मुदत

आधारशी सर्व सेवा संलग्न करण्यासाठी सरकारकडून अनेकदा डेडलाईन देण्यात आल्या. ही डेडलाईन ३१ डिसेंबरपासून ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली होती. पण अंतिम आदेश जारी होईपर्यंत अंतिम मुदत नाही असे न्यायालयाने सांगितलं होतं. त्यामुळे यूआयडीएआयने पुढील आदेश मिळेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा