Advertisement

मुंबईत स्वाईन फ्लूमुळे एसीपीचा बळी


मुंबईत स्वाईन फ्लूमुळे एसीपीचा बळी
SHARES

मुंबईत पसरलेल्या स्वाईन फ्लूच्या झळा आता मुंबई पोलिसांना देखील बसू लागल्या आहेत. ट्रॅफिक विभागात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस उपायुक्त दिलीप शिंदे यांचा मंगळवारी स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण पोलिस खात्यात हळहळ व्यक्त होत आहे.

दिलीप शिंदे हे वरळी येथील वाहतूक मुख्यालयात पोलिस उपायुक्त पदावर कार्यरत होते. दिलीप यांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून वांद्र्यातील होली फॅमिली रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण मंगळवारी संध्याकाळी प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला.

बुधवारी सकाळी वंद्र्याच्या कार्टर रोड येथील पोलिस वसाहतीत असलेल्या घरी त्यांचे पार्थिव आणण्यात आले. त्यानंतरच सकाळी 11 वाजेच्या सुमारास दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मूळचे सोलापूरचे असलेले दिलीप शिंदे 1887 साली पोलिस खात्यात भर्ती झाले होते. त्यानंतर त्यांनी धारावी, माहीम आणि सांताक्रूझ यांसारख्या पोलिस ठाण्यात आपले कर्तव्य पार पडले.




हेही वाचा - 

मुंबईत स्वाईन फ्लू वाढतोय... आपण जबाबदार कधी होणार?

मुंबईत स्वाईन फ्लूचे 21 रुग्ण


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा