मुंबईत स्वाईन फ्लूचे 21 रुग्ण

  Mumbai
  मुंबईत स्वाईन फ्लूचे 21 रुग्ण
  मुंबई  -  

  मुंबईत आतापर्यंत स्वाईन फ्लूचे 21 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात स्वाईन फ्लूचे 13 रुग्ण आढळून आले होते. मुंबईत 2015 या वर्षी स्वाईन फ्लूच्या 3 हजार 29 रुग्णांची नोंद झाली होती. 

  [हे पण वाचा - स्वाइन फ्लू आला, तब्येत सांभाळा]

  रुग्णांची वाढती संख्या आणि अपुऱ्या व्यवस्थापनामुळे मुंबईत 30 हून अधिक रुग्णांना प्राण देखील गमवावे लागले होते. त्यानंतर उपाययोजना केल्याने 2016 मध्ये स्वाईन फ्लूचा प्रभाव कमी आढळून आला. पण यावर्षी सुरूवातीपासूनच स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात स्वाईन फ्लूची लागण झालेले 9 रुग्ण आढळून आले होते. हे सर्व रुग्ण दादर, परळ, लालबाग आणि भायखळा या परिसरातील होते. यावरून 5 महिन्यात मुंबईत 21 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. तसंच 28 एप्रिलला वरळीतील एका दिड महिन्याच्या चिमुकल्याचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. 

  'स्वाईन फ्लूची भीती न बाळगता स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. ताप आणि सर्दी झाल्यास घरगुती उपाय न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, तोंडाला मास्क वापरावा', असा सल्ला पालिकेच्या साथीरोग नियंत्रण विभागाच्या प्रमुख डॉ. मिनी खेत्रपाल यांनी दिला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.