स्वाइन फ्लू आला, तब्येत सांभाळा

  Mumbai
  स्वाइन फ्लू आला, तब्येत सांभाळा
  मुंबई  -  

  राज्यासह मुंबईत स्वाइन फ्लूचा वाढता प्रभाव दिसून येत आहे. आतापर्यंत मुंबईत स्वाइन फ्लूचे वेगवेगळ्या ठिकाणांहून एकूण 9 रुग्ण आढळले आहेत. तर, राज्यात 103 रुग्ण आढळले आहेत. सातत्याने बदलत जाणाऱ्या हवामानामुळे स्वाइन फ्लू मोठ्या प्रमाणात पसरत आहे . राज्यभरातील रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रशासनानेही कंबर कसलीये.

  काय आहे स्वाइन फ्लू?

  स्वाइन फ्लू हा व्हायरस आहे. स्वाईन फ्लूला पिग इन्फ्लुएंझा, हॉग फ्लू, पिग फ्लू किंवा H1N1 व्हायरस असेही म्हटले जाते. हा एक प्रकारचा संसर्गजन्य आजार आहे. ए टाइपच्या इन्फ्लूएंझापासून होणारा श्वसन तंत्राशी संबंधित आजार म्हणजे स्वाइन फ्लू. सामान्य तापामध्येही या व्हायरसचा धोका असतो. हे जिवाणू वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. 2009 मध्ये या व्हायरसचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला होता.

  स्वाइन फ्लूची लक्षणे

  • थंडी वाजणे
  • 100 डिग्री पेक्षा जास्त ताप
  • सर्दी, खोकला होणे
  • घसा दुखणे किंवा खवखवणे
  • अंगदुखी किंवा पोटदुखी
  • नाकातून पाणी येणे
  • भयानक डोकं दुखणे
  • फ्रेश न वाटणे

  असा पसरतो स्वाइन फ्लू –

  जेव्हा तुम्ही खोकता, शिंकता तेव्हा या व्हायरसचे जिवाणू हवेत किंवा जमिनीवर पसरतात. हेच जिवाणू हवेतून दुसऱ्या व्यक्तीच्या नाक किंवा तोंडातून शरीरात प्रवेश करतात. तसंच स्वाइन फ्लू झालेल्या व्यक्तीने जर मोबाईल, कि-बोर्ड, रिमोट कंट्रोल अशा वस्तूंना हात लावला तरी स्वाइन फ्लू पसरू शकतो.

  ‘आत्तापर्यंत मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणांहून स्वाईन फ्लूचे 9 रुग्ण सापडले आहेत. त्यांना वेळीच दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात स्वाईन फ्लूचे 2, मार्चमध्ये 5 आणि एप्रिलमध्ये 2 रुग्ण सापडले आहेत. स्वाईन फ्लू या आजारासाठी आम्ही फेब्रुवारी, मार्चपासूनच तयारी केली आहे. यासाठी आम्ही पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लूसाठीच्या गाईडलाईन्स पाठवल्या आहेत. तसंच आपातकालीन परिस्थितीत व्हेंटिलेटरचीसुद्धा तयारी केली आहे. 

  स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले तर जनजागृती म्हणून मीडिया आणि जाहिरातीद्वारे जनजागृती करत आहोत. तसंच गर्भवती महिला, लहान मुलं आणि वृद्धांमध्ये हा आजार होण्याचं जास्त प्रमाण आहे. त्यामुळे जर असा कोणी रुग्ण आढळला तर तातडीने त्याला आणि त्याच्या शेजारच्यांना तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,’ अशी माहिती साथ रोग नियंत्रण कक्षाच्या डॉ. मिनी खेत्रपाल यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.