Advertisement

मुंबईतल्या २४ रुग्णालयांवर अग्निशमन यंत्रणेतील त्रुटींमुळे कारवाई

मुंबईतील एकूण १५४४ रुग्णालयांपैकी ६८७ रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणेत त्रुटी आढळल्या आहेत.

मुंबईतल्या २४ रुग्णालयांवर अग्निशमन यंत्रणेतील त्रुटींमुळे कारवाई
SHARES

मुंबईतील एकूण १५४४ रुग्णालयांपैकी ६८७ रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणेत त्रुटी आढळल्या आहेत. या रुग्णालयांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६६३ रुग्णालयांनी आपल्या त्रुटींची पूर्तता केली असून २४ रुग्णालयांनी मात्र याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या रुग्णालयांवर महापालिकेमार्फत कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरात दिली.

भाटिया रुग्णालयाजवळील सचिनम हाइट्स या इमारतीला नुकतीच आग लागली होती. या इमारतीत अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नसल्यासंदर्भात अमित साटम, मंगलप्रभात लोढा, रोहित पवार, रईस शेख आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर दिलेल्या लेखी उत्तरात एकनाथ शिंदे यांनी वरील माहिती दिली.

सचिनम हाइट्स इमारतीच्या आगीप्रकरणी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी चौकशी करण्याचे आदेश दिले असून उपआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची नियुक्ती केली असून, प्राथमिक चौकशीची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. तर राज्यातील ५२८ पैकी ४३८ आरोग्य संस्थांना अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी निधी मंजूर केल्याची माहिती यावेळी दिली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा