सेनापती बापट मार्गावरील 80 अनधिकृत झोपड्यांवर कारवाई

  Dadar
  सेनापती बापट मार्गावरील 80 अनधिकृत झोपड्यांवर कारवाई
  मुंबई  -  

  दादर, माहिम परिसरातील सेनापती बापट मार्गालगतच्या पदपथांवरील अनधिकृत झोपड्यांवर शुक्रवारी महापालिकेच्यावतीने धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान 80 अनधिकृत झोपड्या तसेच शेड्स हटविण्यात आल्यामुळे हा रस्ता तसेच पदपथ मोकळा झाला आहे

  जी-उत्तर विभागात अनधिकृत फेरीवाले, तसेच शेडधारी अनधिकृत विक्रेते,आणि अनधिकृत झोपड्या आदींच्याविरोधात महापलिकेच्यावतीने धडक कारवाई सुरु करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये दादर-माहीम परिसरातील सेनापती बापट मार्गावरील अनधिकृत व्यवसाय, अनधिकृत कच्च्या झोपड्या तसेच अतिक्रमणांवर सलग दोन दिवस कारवाई करण्यात येऊन रस्ते व पदपथ मोकळे करण्यात आले असल्याचे जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांनी सांगितले. उपायुक्त आनंद वाघ्राळकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत मुंबई पोलीस दलातील 34 पोलीस आणि महापालिकेचे 49 कामगार- कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी कार्यरत होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.