Advertisement

रेल्वेमार्गाजवळील अनधिकृत बांधकामांवर रविवारी कारवाई


रेल्वेमार्गाजवळील अनधिकृत बांधकामांवर रविवारी कारवाई
SHARES

 रेल्वेलगतच्या बांधकामांची पाहणी करून ती त्वरीत पाडण्याच्या सूचना पश्चिम रेल्वेने महापालिकेला दिल्या आहेत. मात्र, रेल्वेलगतच्या बांधकामांची पाहणी केल्यानंतर ती पाडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या कारवाईतच रेल्वेने अडथळा आणला आहे. बांधकामे जरूर तोडा, परंतू रेल्वेचं जंबो ब्लॉक असेल त्याचवेळी असं सांगत महापालिकेला कारवाई पुढे ढकलायला लावली आहे.


कारवाईत रेल्वेचा अडथळा 

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल येथील बेलासिस रोडवर सिमेंट गोडाऊनजवळील रेल्वेच्या संरक्षण भिंतीवर केलेल्या बांधकामांबाबत पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेला पत्र लिहून ती बांधकामे तोडून टाकण्याची सूचना केली होती. यावेळी रेल्वे अधिकारी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या संयुक्त पाहणीमध्ये ही अनधिकृत बांधकामे आढळून आली. त्यामुळे ८ व ९ ऑगस्ट दरम्यान बांधकामे तोडण्याची कारवाई होणार होती. परंतु या कारवाईलाच रेल्वेने आक्षेप घेतला. 


जम्बो ब्लॉक दिवशी कारवाई

कारवाईदरम्यान रेल्वे रुळांवर रॅबीट पडण्याची शक्यता लक्षात घेता संरक्षण भिंतीशेजारी असलेल्या रेल्वे रुळांवरून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांबाबत योग्य ती खबरदारी घेऊन कारवाईला सहकार्य करण्याची सूचना महापालिकेने रेल्वेला दिली होती. त्यानुसार पश्चिम रेल्वेने ९ ऑगस्टला महापालिकेला पत्र पाठवून १२ ऑगस्ट रोजी जम्बो ब्लॉक घेण्यात येत असून दिवशी ही कारवाई करण्याचा सूचना महापालिकेला केल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या कर्मचारी,अधिकाऱ्यांना रविवारची सुट्टी असून आता केवळ रेल्वेच्या सूचनेनुसार ही कारवाई जंबो ब्लॉकच्या दिवशी करावी लागणार आहे. याबाबत डी विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही याला दुजोरा दिला आहे. 



हेही वाचा - 

मोटरमनचा संप अखेर मागे, मरेच्या ७९ फेऱ्या रद्द

'शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'मध्ये निघाली भरती




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा